Health Tips: केळीवर काळे डाग आल्यास ती केळी खावी की फेकून द्यावी! वाचा काय म्हणतात याबद्दल तज्ञ?

Ajay Patil
Published:
health tips

Health Tips:- सुदृढ आरोग्याकरिता आणि निरोगी शरीराकरिता आपल्याला संतुलित आहाराची गरज असते व त्यासोबतच विविध प्रकारच्या फळांचे सेवन देखील महत्त्वाचे असते. अशा प्रकारची फळे व आहाराच्या माध्यमातून शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्वे आणि इतर महत्त्वाचे पोषक घटक मिळत असतात.

त्यामुळे आरोग्य चांगले राहते. संतुलित आहारामध्ये भाजीपाल्यासोबतच फळे खाण्याचा सल्ला डॉक्टरांच्या माध्यमातून दिला जातो. आहारात जर फळांचा समावेश केला तर फळांच्या सेवनाने शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा मिळते फळामध्ये असलेले जे काही फायबर्स असतात ते पोटाशी संबंधित असलेल्या समस्या दूर करतात.

अशाच प्रकारचे अनेकविध फायदे केळीच्या सेवनाने मिळतात. शरीराला इन्स्टंट एनर्जी हवी असेल तर केळी खाल्ल्याने ती मिळते. तसेच केळी या फळाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे केळ हे प्रत्येक हंगामामध्ये तुम्हाला उपलब्ध होते.

केळीच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण केळी विकत घेतल्यानंतर साधारणपणे एक किंवा दोन दिवसांमध्ये त्यावर काळे स्पॉट म्हणजेच डाग दिसायला लागतात व केळी नरम होते.

त्यामुळे बरेच व्यक्ती असे काळे डाग पडलेली केळी न खाता ती फेकून देतात. परंतु जर काळे डाग पडलेल्या केळीचे फायदे पाहिले तर तुम्ही कधीच काळे डाग पडलेली केळी फेकणार नाहीत.

 काळे डाग पडलेल्या केळी खाण्याचे फायदे

1- ज्या केळीला काळे डाग पडतात अशा केळीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. एवढेच नाही तर पोटॅशियम, मॅग्नेशियम तसेच विटामिन सी, विटामिन बी सहा इत्यादी घटक देखील मोठ्या प्रमाणावर असतात. यातील महत्त्वाचे पोषक तत्वे हे मानसिक व शारीरिक आरोग्य करीता देखील उत्तम ठरतात.

2- जास्त प्रमाणात पिकलेल्या केळ्यातील फायबर्स खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी खूप मदत करतात. त्यामुळे पोटाच्या अनेक समस्या उद्भवत नाहीत.

3- तसेच अशा प्रकारची केळी हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी देखील फायदेशीर आहे. अशा केळीमध्ये असलेले पोटॅशियम हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते व एवढेच नाही तर ब्लड प्रेशर देखील नियंत्रणात राहतो.

4- तसेच केळीमध्ये नॅचरल साखरेचे प्रमाण जास्त असते व शरीराला इन्स्टंट एनर्जी मिळण्यासाठी केळी महत्त्वाचे ठरते. याप्रकारे शरीराला इन्स्टंट एनर्जी मिळाल्याने थकवा कमी होतो.

5- तसेच केळीमध्ये असलेल्या फायबर्स मुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते व भूक खूप कमीत कमी लागते. त्यामुळे व्यक्ती परत परत खात नाही व वजन कमी करण्यासाठी देखील याचा फायदा होतो.

काळे डाग पडलेल्या केळीच्या बाबतीत डॉक्टर सांगतात की, हलके डाग असलेली केळी जास्त प्रमाणामध्ये पौष्टिक असते व त्यामध्ये मिनरल्स तसेच विटामिन्स आणि अँटिऑक्सिडंट चे प्रमाण खूप जास्त असते एवढेच नाही तर भरपूर प्रमाणामध्ये यातून पोषण देखील मिळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe