Health Tips: उत्तम आरोग्य करिता दही चांगले की ताक? वाचा आयुर्वेद काय म्हणते?

health benifit to curd

Health Tips:- उत्तम आरोग्याकरिता संतुलित आहाराची खूप मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. हे आहारामध्ये प्रत्येक व्यक्ती पोळी भाजी, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, हिरवा भाजीपाला तसेच मटन, मासे यासारख्या मांसाहारी पदार्थांचा समावेश करतात.

कारण शरीराच्या सुदृढ आरोग्या करिता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पोषक घटकांची आवश्यकता असते व अशा आहाराच्या माध्यमातून हे पोषक घटक आपल्याला मिळत असतात. या सोबतच आपण आहारामध्ये अनेक दुग्धजन्य अशा पदार्थांचा देखील समावेश करतो.

दुधासोबतच आहारामध्ये बरेच जण दही आणि ताक यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. आपल्याला माहित आहेच की दुधापासूनच दही तयार केले जाते व यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन आणि इतर आवश्यक पोषक तत्वे असतात. याच दह्यापासून ताक तयार केले जाते.

हे देखील आपल्याला माहित आहे व या ताकाला देखील आयुर्वेदामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर महत्त्व आहे. दही व ताकाचे आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठे फायदे देखील आहेत. परंतु बऱ्याचदा मनामध्ये प्रश्न येतो की दही आणि ताकापैकी आरोग्यासाठी काय जास्त फायद्याचे आहे? याचे उत्तर आपण या लेखात बघणार आहोत.

 दही ताकाचे आरोग्यदायी फायदे

1- दह्याचे आरोग्यदायी फायदे दही म्हटले म्हणजे दही हा पदार्थ प्रोबायोटिक्स अर्थात प्रतिजैविकाचा एक उत्तम स्रोत असून यामुळे पचनक्रिया खूप चांगली राहण्यास मदत होते व शरीराला आवश्यक पोषक घटक देखील मिळतात. एवढेच नाही तर दह्यामध्ये उच्च प्रकारचे प्रथिन्स असतात

व त्यासोबतच कॅल्शियम देखील मोठ्या प्रमाणावर असते. या कॅल्शियममुळे हाडे व दाते मजबूत राहण्यास मदत होते. तसेच प्रोबायोटिक्स असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास देखील मदत होते. त्यामुळे आपल्या शरीराचे संसर्गापासून संरक्षण होण्यास मदत होतेच व पचनक्रिया देखील सुधारते.

2- ताकाचे आरोग्यदायी फायदे ताकाचा विचार केला तर यामध्ये लॅक्टिक ऍसिड असते व यामुळे पचनक्रिया चांगली राहते. पोटाचे आरोग्य उत्तम राहते. अनेक वेळा अपचनासारखे समस्या अथवा एसिडिटी दूर करण्यासाठी देखील ताकाचा उपयोग होतो. ज्याप्रमाणे दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात

अगदी त्याचप्रमाणे ताकात देखील प्रोबायोटिक्स असतात  व ते शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात व पचनक्रिया देखील चांगले राहते व रोगप्रतिकारक शक्ती वाढते. महत्त्वाचे म्हणजे ताक हा अनेक आवश्यक पोषक घटकांचा उत्तम स्त्रोत असून यामध्ये कॅल्शियम, विटामिन बी 12, रायबो प्लेविन आणि फॉस्फरस चा देखील मोठ्या प्रमाणावर अंतर्भाव होतो.

दुधाच्या तुलनेमध्ये ताकात फॅटचे प्रमाण कमी असते. ताक एक हायड्रेटींग पेय म्हणून देखील ओळखले जाते. ताकात कॅल्शियम आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणावर असते व हे हाडांच्या मजबुती व निरोगी हाडांसाठी खूप महत्वाचे असतात.

 उत्तम आरोग्य करिता दही कि ताक?

या दोघांचा विचार केला तर ताक हा दह्याला एक उत्तम आणि आरोग्याच्या दृष्टीने चांगला पर्याय असल्याचे आयुर्वेदाने म्हटले आहे. तसेच ताकासोबत तुम्ही मीठ आणि कोथिंबीर व जिरे पावडर यासारख्या मसाल्यांचा वापर केला

तर स्वाद तर वाढतोच. परंतु आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील खूप मोठा फायदा मिळतो. यावरून आपल्याला दिसून येते की आरोग्याच्या दृष्टिकोनातून दही आणि ताक  कमी अधिक फरकाने गुणकारी आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe