Health Tips: पाणी पिण्याचे देखील नियम असतात! आहेत का तुम्हाला माहिती? वाचा महत्त्वाची माहिती

Published on -

Health Tips:- शरीराच्या दृष्टिकोनातून पाहिले तर अनेक छोट्या-मोठ्या आपल्या नित्याच्या सवयींचा कळत नकळत परिणाम हा शारीरिक आरोग्यावर होत असतो. अगदी तुमची झोपण्याची आणि उठण्याची वेळेपासून तर जेवणाच्या वेळा या सगळ्यांचा चांगला- वाईट परिणाम हा शारीरिक आरोग्यावर होतो.

आहाराच्या बाबतीत संतुलित आहार सेवन करणे हे शरीर निरोगी ठेवण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. त्यासोबतच पाणी हे शरीरासाठी खूप महत्त्वाचे असून शरीरामध्ये साठ ते सत्तर टक्के पाणीच असते. त्यामुळे पाणी पिण्याच्या दृष्टिकोनातून देखील आयुर्वेदानुसार काही नियम आहेत.

तुमच्या दैनंदिन रुटीन मध्ये तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टींचे पालन करणे हे आयुर्वेदानुसार खूप महत्त्वाची बाब आहे व ते शरीरासाठी फायदेशीर देखील आहे. याच अनुषंगाने आयुर्वेदामध्ये पाणी कसे प्यावे आणि किती प्रमाणात प्यायला पाहिजे इत्यादी बद्दल खूप महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे. याच दृष्टिकोनातून आपण आयुर्वेद तज्ञांनी याबाबतीत सांगितलेली महत्त्वाची माहिती बघणार आहोत.

 आयुर्वेदानुसार पाणी कसे प्यावे?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एका सोशल मीडिया अकाउंट वर प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉ. मृणालिनी जोशी यांनी माहिती शेअर केली असून यामध्ये त्यांनी पाणी कोणत्या पद्धतीने प्यावे व किती प्यावे याबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन केलेले आहे. त्यानुसार पाहिले तर…..

1- अजीर्ण झाल्यावर कोणते पाणी प्यावे?- बऱ्याचदा अपचन म्हणजेच अजीर्णचा त्रास होतो. अशावेळी तुम्ही कोमट पाणी घेणे खूप गरजेचे आहे. अशा त्रासामध्ये कोमट पाणी हे खूप महत्त्वाचे काम पार पाडते. या परिस्थितीत  कोमट पाणी औषधासारखेच काम करते. यामध्ये तुम्ही जर कोमट पाणी योग्य प्रमाणामध्ये पिले तर फायदा मिळतो.

2- जेवण केल्यानंतर किती वेळात प्यावे पाणी?- बऱ्याचजणांना जेवण केल्यानंतर बहुतांशी लगेच पाणी पिण्याची सवय असते. परंतु आयुर्वेदानुसार पहिले तर जेवण केल्यानंतर दीड तासानंतरच पाणी प्यावे. तुम्ही असे केल्यास तुम्हाला ताकद मिळण्यासाठी मदत होते. अन्न पचावे याकरिता पाण्याची गरज असते. अशा प्रसंगी तुम्ही जर जेवण केल्यानंतर दीड ते दोन तासांनी पाणी पिले तर त्याचा नक्कीच फायदा मिळतो.

3- जेवण करत असताना पाणी पिणे जेवताना किंवा जेवायला बसल्यावर आहारा सोबत पाणी पिणे हे अमृता सारखे आहे. कारण आपण जे काही अन्न खातो ते शरीरात पुढे ढकलायला पाण्याची गरज असते. म्हणून जेवण करताना थोडे पाणी प्यायल्यावर ते अमृता सारखे सिद्ध होते.

4- जेवण झाल्यानंतर पाणी पिणे फायद्याचे की तोट्याचे जेवण झाल्यानंतर पाणी पिले तर ते शरीरामध्ये अगदी विषाप्रमाणे काम करते. त्यामुळे जेवण केल्यानंतर कधीच पाणी पिऊ नये. एक तर जेवण करत असताना प्यावे किंवा जेवल्यानंतर एक ते दोन तासांनी प्यावे.

 पाणी कशा पद्धतीने प्यावे?

आयुर्वेदानुसार जर पाणी पिण्याची पद्धत पाहिली तर सर्वात प्रथम पाणी उभ्याने कधीच पिऊ नये. तसेच पाणी पिताना ते सावकाश ग्लासला अथवा पाणी पिताना तोंड लावून पाणी प्यावे. ज्या पद्धतीने आपण चूळ भरतो व तोंडामध्ये पाणी फिरवतो अगदी त्याच पद्धतीने पाणी पिताना देखील ते तोंडामध्ये फिरवावे व नंतर प्यावे. सर्वात महत्वाचे म्हणजे पाणी पिताना ते सावकाश प्यावे व कधीच घटाघटा पाणी पिऊ नये.

अशा पद्धतीने पाणी पिण्यासंबंधीचे महत्त्वाचे नियम आयुर्वेदात सांगितलेले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News