Health Tips: करा ‘हे’ छोटेसे उपाय आणि वारंवार तोंड येण्यापासून मिळवा मुक्तता! सोपे उपायांपासून मिळेल एकदम आराम

Ajay Patil
Published:
home remedies on mouth alcer

Health Tips:- तोंड येण्याची समस्या आपल्यापैकी बऱ्याच जणांना असते. बऱ्याच जणांना कोणत्याही ऋतूमध्ये आणि प्रत्येक वेळी वारंवार तोंड येत असते. यामुळे व्यक्तीला खाणे पिणे देखील अवघड होऊन जाते. तुम्ही थोडे जरी काही खाल्ले तरी तोंडामध्ये तीव्र स्वरूपाच्या वेदना व्हायला लागतात व या समस्या प्रामुख्याने ओठांवर तसेच तोंडाच्या आत आणि घशामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर जाणवतात.

या समस्येमुळे संबंधित व्यक्तीला खूप मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागते. जेवण तर सोडाच परंतु पाणी पिणे देखील अवघड होते व बोलताना देखील समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. बऱ्याचदा शरीरातील उष्णता वाढल्याने देखील तोंडामध्ये फोड येण्याची समस्या उद्भवते व वारंवार तोंड येण्याच्या समस्येमुळे हे होऊ शकते.

तोंड आल्यानंतर व्यक्ती अनेक प्रकारच्या घरगुती उपाययोजनांचा देखील प्रयोग करून पाहता तसेच डॉक्टरांकडे जाऊन देखील अनेक प्रकारचे औषधी घेतात. परंतु बऱ्याचदा तरी देखील सहसा हवा तेवढा आराम मिळताना दिसून येत नाही. या अनुषंगाने या लेखांमध्ये आपण काही सोपे असे घरगुती उपाय पाहणार आहोत ज्यामुळे तुम्ही वारंवार तोंड येण्याच्या समस्येपासून मुक्तता मिळवू शकतात.

 वारंवार तोंड येत असेल तर हे उपाय ठरतील फायद्याचे

1- दहीचा वापर दही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे व हे प्रोबायोटिक असल्यामुळे आतड्यांकरिता हे खूप उत्तम मानले जाते. तुमच्या तोंडामध्ये जर फोड येत असतील तर याकरिता तुम्ही दही खाऊ शकतात. दहिमुळे अल्सर ची जळजळ कमी होण्यास खूप मोठ्या प्रमाणावर मदत होते.

2- ब्लॅक टी ब्लॅक टी हे वारंवार तोंड येण्यापासून आराम मिळावा याकरता खूप फायद्याचे आहे. ब्लॅक टीमध्ये जे काही टॅनिन असते ते वारंवार तोंड येण्याच्या समस्येपासून मुक्तता मिळवण्यासाठी मदत करते. याकरिता तुम्हाला ब्लॅक टी बॅग एक कप गरम पाण्यामध्ये भिजवावी लागते आणि काही वेळाने पिशवी थंड झाल्यावर फोडांवर ती लावावी. असं केल्याने अल्सर पासून खूप मोठ्या प्रमाणावर आराम मिळतो.

3- लवंगचा वापर लवंग हा एक मसाल्याचा पदार्थ म्हणून आपल्याला माहिती आहे. लवंगा मध्ये वेदनाशामक व अँटिबॅक्टरियल इत्यादी महत्त्वाचे गुणधर्म असतात. हे गुणधर्म तोंडात आलेल्या फोडांचे जंतूंपासून संरक्षण करतात व  झालेले फोड लवकरात लवकर बरे होण्यासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणावर मदत करतात. या फोडांमुळे जी काही वेदना होत असते त्यापासून देखील त्वरित आराम मिळवण्यासाठी फायद्याचे ठरतात.

त्यामुळे या तीन घरगुती उपाय जर केले तर तोंड येण्यापासून आराम मिळू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe