PAN Card Apply : घरबसल्या 10 मिनिटात बनवा नवीन पॅन कार्ड, जाणून घ्या प्रक्रिया !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PAN Card Apply : आयकर रिटर्न भरण्यापासून ते बँक व्यवहार करण्यापर्यंत आपल्याला सर्वठिकाणी पॅनकार्डची गरज भासते. अशास्थितीत तुमच्याकडे पण कार्ड असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर तुम्ही अनेक सुविधांपासून वंचित राहू शकता. अशातच तुम्हालाही नवीन पॅन कार्ड काढायचे असेल तर तुम्ही हे घरबसल्या देखील करू शकता.

तुम्ही घरी बसून तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने नवीन पॅन कार्ड काढू शकता किंवा तुमच्या जुन्या पॅनकार्ड मध्ये काही चूक असल्यास ते अपडेट करू शकता. ई-गव्हर्नन्सच्या मदतीने तुम्ही पॅनकार्ड संबंधितली सर्व कामे तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने अगदी घरी बसून करू शकता. होय, तुम्हाला यासाठी कोणत्याही ऑफिस किंवा इंटरनेट कॅफेला भेट देण्याची गरज नाही. तुम्ही खाली दिलेल्या पायऱ्या फॉलो करून घरबसल्या नवीन पॅनकार्ड मिळवू शकता. चला तर मग…

ऑनलाईन पॅन कार्ड बनवण्याची सोपी पद्धत

-यासाठी सर्वप्रथम तुम्हाला इन्कम टॅक्सच्या ई-फायलिंग पोर्टलवर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला आधार विभागातून झटपट पॅनमधील क्विक लिंक्सवर जावे लागेल.

-त्यानंतर एक नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला Get New PAN वर क्लिक करावे लागेल.

-त्यानंतर नवीन पॅनकार्डसाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर कॅप्चा कोड टाकून आधारशी लिंक केलेल्या मोबाइलवर ओटीपी जनरेट करावा लागेल.

-मोबाईलमध्ये मिळालेला ओटीपी ऑथेंटिकेट करावा लागेल.

-त्यानंतर आधार तपशीलही प्रमाणित करावा लागेल.

-त्यानंतर ई-मेल आयडीची पडताळणी करावी लागेल.

-त्यानंतर आधार क्रमांकाचा ई-केवायसी डेटा UIDAI सोबत शेअर केला जाईल त्यानंतर तुम्हाला झटपट पॅन मिळेल.

-त्यानंतर तुम्ही तुमचा पॅन पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाउनलोड करू शकता.

-या संपूर्ण प्रक्रियेत तुम्हाला कोणतेही कागदपत्र द्यावे लागणार नाही.

-तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही 50 रुपयांमध्ये पॅन कार्डचे रिप्रिंट ऑर्डर करू शकता आणि लॅमिनेटेड पॅन कार्ड तुमच्या घरच्या पत्त्यावर मिळवू शकता.