Health Update :- सध्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकदा खाण्यापिण्याच्या सवयींवर देखील विपरीत परिणाम होत आहे. अनियमितपणे जेवणाच्या सवयी तसेच मोठ्या प्रमाणावर फास्ट फूडचा वापर इत्यादी अनेक कारणे विविध प्रकारच्या व्याधी होण्याला कारणीभूत ठरत आहेत. तसेच अनियमित आहाराच्या सवयीमुळे बऱ्याचदा पोटाच्या संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. तसेच लठ्ठपणा, हाय ब्लड प्रेशर, हृदयरोगासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.
त्यामुळे खाण्यापिण्याच्या बाबतीत खूप जागरूक राहणे गरजेचे आहे. याच पद्धतीने जर आपण खाण्यापिण्याच्या बाबतीतल्या सवयी आणि जीवनशैली इत्यादींमुळे होणाऱ्या आजार किंवा व्याधींचा विचार केला तर यामध्ये मुळव्याध ही समस्या खूप त्रासदायक अशी आहे. आपल्याला माहित आहेच की मुळव्याध असलेल्या लोकांना शौचास खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होतो.
कधी कधी मोठ्या प्रमाणावर रक्त देखील जाते व खूप मोठ्या प्रमाणावर आग होते. जर आपण समाजामध्ये पाहिले तर अनेक लोक मुळव्याधामुळे त्रस्त आहेत. अनेक लोक डॉक्टरांकडे जाऊन किंवा अनेक प्रकारच्या औषधांचा आधार घेतात. परंतु बऱ्याचदा कुठलाही फायदा होताना दिसून येत नाही.
याचा अनुषंगाने जर तुम्हाला मुळव्याधापासून आराम मिळवायचा असेल तर किंवा होणारा त्रास कमी करायचा असेल तर तुम्ही लिंबू आणि दूध यांचा वापर करून काहीशा प्रमाणात ही समस्या कमी करू शकतात. याबाबत आयुर्वेद तज्ञांनी देखील काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे.
दुधापासून मुळव्याधाची समस्या कमी होऊ शकते का?
साधारणपणे जर आपण मुळव्याधाच्या समस्येचा विचार केला तर ही समस्या जर असेल तर दूध किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ टाळणे फायद्याचे ठरते. कारण दूध किंवा त्यापासून बनवलेले दुग्धजन्य वस्तूंचे सेवन केले तर बद्धकोष्ठता होण्याची शक्यता बळावते. परंतु जर तुम्हाला मुळव्याधापासून आराम मिळवायचा असेल तर तुम्ही थंड दूध, दही आणि कच्चे दूध घेऊ शकतात. कारण यामुळे त्रास होण्याची शक्यता कमीत कमी असते.
लिंबू फायदेशीर ठरू शकतो का?
जर आपण पाहिले तर लिंबू आणि दुधाचे सेवन मुळव्याधीच्या समस्यामध्ये खूप फायदेशीर मानले जाते. मुळव्याध असलेल्या व्यक्तीने जर लिंबूचे सेवन केले तर आतड्यांची समस्या कमी होते व लिंबाच्या रसामध्ये असलेल्या अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटिऑक्सिडंट गुणांमुळे गुद्दरातील सूज आणि वेदना कमी व्हायला मदत होते. यासाठी सकाळी अनाशापोटी यांचे सेवन करण्याचा सल्ला प्रामुख्याने दिला जातो. मल पास होण्याला म्हणजे शौचाला त्रास होत नाही.
दूध आणि लिंबूचे सेवन कसे करावे?
याबाबत तज्ञांचे मत पाहिले तर मुळव्याधाची समस्या कमी करण्याकरिता किंवा टाळण्यासाठी दूध आणि लिंबूचा वापर हा फायदेशीर आहे. दोन्ही पदार्थ तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे गरजेचे असून यामध्ये लिंबाचा रस आणि दुधाचे सेवन करण्याकरिता सकाळी अनाशापोटी एक ग्लास थंड पाण्यामध्ये एक लिंबू पिळून घ्यावा व हे मिश्रण सेवन करावे. अशा पद्धतीने मुळव्याधाची समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच तुम्हाला दूध घ्यायचे असेल तर तुम्ही संपूर्ण दिवसात कधीही एक क्लास दूध पिऊ शकतात.
अशा पद्धतीने लिंबू आणि दूध मुळव्याधाची समस्या कमी करण्यास मदत करू शकतात.