Popcorn Brain Disease: तुम्हाला माहिती आहे का ‘पॉपकॉर्न ब्रेन’ आजार काय आहे? म्हणतात सोशल मीडियामुळे होतो! वाचा माहिती

Ajay Patil
Published:
popcorn brain disease

Popcorn Brain Disease:- सध्या कुठला आजार कोणत्या परिस्थितीत व्यक्तीला होईल व त्या आजाराचे नाव असेल याबाबत कुठल्याही प्रकारची शाश्वती देता येत नाही. आपल्याला माहित आहे की कुठल्याही प्रकारचा आजार झाला तरी त्यामागे कुठलेतरी कारण असतेच. हे आपल्याला माहिती आहे.

परंतु सोशल मीडियाच्या जास्त वापरामुळे देखील आजार होऊ शकतो हे जर तुम्हाला कोणी सांगितले तर विश्वास बसणार नाही. परंतु ही बाब खरी आहे. सध्या सोशल मीडियाचा वापर नको तेवढ्या प्रमाणामध्ये केला जात असून माणसाचा बराच वेळ हा मोबाईल मध्ये जातो.

एकप्रकारे सोशल मीडियाचे व्यसनच माणसांना लागलेले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सोशल मीडियाचा अतिवापर म्हणजेच मोबाईलचा मोठ्या प्रमाणावर वापर करणे हे देखील अनेक दृष्टिकोनातून शरीरासाठी घातक आहे. सोशल मीडियाच्या जास्त वापरामुळेच पॉपकॉर्न ब्रेन आजार पसरत असल्याचे एका संशोधनामध्ये समोर आले आहे.

 नेमका काय आहे पॉपकॉर्न ब्रेन आजार?

प्रत्येक जण प्रत्येक दिवसाला मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर करत असतात. जेव्हा आपण सोशल मीडियाच्या वापरा करिता मोबाईल हातात घेतो तेव्हा आपण आपल्या कामांमध्ये लक्ष केंद्रित करू शकत नाही. जरी आपण कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला तरी आपण जास्त वेळ पर्यंत हे लक्ष केंद्रित करण्यात असमर्थ ठरतो.

असे जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर तुम्हाला पॉपकॉर्न ब्रेन आजाराची लागण झालेली असण्याची शक्यता असू शकते. पॉपकॉर्न ब्रेन ही संकल्पना 2011 साली यूडब्ल्यूआय स्कूल मधील संशोधकांनी समोर आणली होती. आपण जेव्हा मोबाईलचा वापर करतो तेव्हा एका वेळेला अनेक विंडो ओपन करत असतो

व परत परत त्या विंडो स्क्रोल करत असतो. त्यामुळे व्यक्तीची विचारशक्ती देखील स्थिर राहत नाही म्हणजे त्याचे विचार देखील एका जागेवर स्थिर राहत नाहीत. जसे आपण मोबाईलमध्ये एका जागेवर स्थिर राहत नाही व एक एक विंडो स्क्रोल करत असतो अगदी त्याच पद्धतीने जेव्हा आपण जीवन जगताना वावरत असतो तेव्हा देखील आपण स्थिर राहत नाही

व एका गोष्टीवर जास्त वेळ फोकस करू शकत नाही. म्हणजेच या संकल्पनेप्रमाणे जसे कढईमध्ये जर पॉपकॉर्न टाकले तर ते तडकू लागतात व इकडे तिकडे उडू लागतात. अगदी याच पद्धतीने आपले विचार देखील स्थिर राहत नाही व ते कढईतील पॉपकॉर्न प्रमाणे इकडे तिकडे जाऊ लागतात. म्हणूनच या आजाराला पॉपकॉर्न ब्रेन असे नाव दिले गेले आहे.

 या आजाराची जास्त काळ असलेली लक्षणे ठरू शकतात नुकसानदायक

जर या आजाराची लक्षणे खूप काळापर्यंत दिसून आली किंवा राहिली तर त्याचा विपरीत परिणाम हा व्यक्तीची स्मरणशक्ती व शिकण्याचे कौशल्य यावर गंभीर स्वरूपात होतो. तसेच मानसिक दृष्ट्या व्यक्तीला नैराश्य येते व अतिचिंता इत्यादी आजार जडण्याची भीती देखील संभवते. त्यामुळे यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

 पॉपकॉर्न ब्रेन आजारापासून बचाव करण्यासाठी काय करावे?

1- याकरिता कमीत कमी आठवड्यातून एकदा किंवा दिवसातून काही तास सोशल मीडिया किंवा डिजिटल उपकरणापासून दूर राहावे.

2- जेव्हा तुम्ही एकाच वेळी अनेक कामे करता त्यामुळे गोंधळ होतो. असं न करता तुम्ही एकाच कामावर एका वेळी लक्ष द्यावे. घेतलेले एक काम पूर्ण होईल तेव्हाच पुढचे काम करावे.

3- जेव्हा तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दिवसातून काही तास हातातील मोबाईल वा इतर डिजिटल उपकरणे बाजूला ठेवाल तेव्हा त्या वेळेत चिंतन म्हणजेच मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करावा. या मोकळ्या वेळेमध्ये तुम्ही योगा किंवा व्यायाम देखील करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe