आजकाल मोबाईलचा वापर विद्यार्थ्यांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक जण करू लागले आहेत. आजचे युग हे स्मार्टफोनचे आणि इंटरनेटचे युग आहे. सध्या आपल्याला प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन दिसून येतो. स्मार्टफोनच्या वापरामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या असल्याने स्मार्टफोनचा वापर हा प्रत्येकासाठी फायद्याचा ठरतो.
परंतु एखाद्या गोष्टीचे जेवढे फायदे असतात तेवढे त्यापासून काही नुकसान देखील असते. आज-काल सोशल मीडियाचा वापर इतका वाढला आहे की स्मार्टफोन वापरणे हा एक व्यसनासारखा प्रकार होऊन गेलेला आहे. बऱ्याच जणांना सवय असते की रात्री झोपताना देखील बेडवर उशीच्या जवळ मोबाईल ठेवून झोपतात.
जर आपण आजची स्थिती पाहिली तर कित्येक जणांचा दिवसाची सुरुवात मोबाईलने व शेवट देखील मोबाईलने होतो.
परंतु जर तुम्हाला देखील रात्री झोपताना सोबत मोबाईल घेऊन झोपायची सवय असेल तर मात्र शरीरावर याचे वाईट परिणाम होऊ शकतात. डब्ल्यूएचओ अर्थात जागतिक आरोग्य संघटने या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
रात्री उशीजवळ मोबाईल ठेवून झोपत असाल तर सावधान
जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार मोबाईल फोन उशीजवळ ठेऊन रात्री झोपले तर आरोग्याला खूप मोठे नुकसान होते.यामुळे कॅन्सरचा धोका देखील बळावतो.
बऱ्याचदा आपल्यापैकी किती जणांना अनुभव आला असेल की जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपला मूड खराब होतो व कुठल्याही कामांमध्ये मन लागत नाही. हे देखील मोबाईल मधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे होते.
या व्यतिरिक्त मज्जातंतू मध्ये होणाऱ्या वेदना तसेच डोकेदुखी व इतर आरोग्य संबंधित समस्यांचे मूळ कारण देखील मोबाईलच्या माध्यमातून निघणारे रेडिएशन आहेत.
तसेच हे रेडिएशन इतके घातक आहे की त्यामुळे तुम्हाला इरेकटाईल डिसफंक्शन होऊ शकते. तसेच या बाबतीत डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे की, फोनमधून उत्सर्जित होणाऱ्या आरएफ रेडिएशनमुळे कर्करोगाचा धोका वाढतो.
मोबाईल उशीजवळ ठेवून झोपण्याचे दुष्परिणाम
जर तुम्ही देखील रात्री जवळ मोबाईल ठेवून झोपत असाल तर ते आरोग्यासाठी घातक आहे. कारण मोबाईलच्या माध्यमातून सतत रेडिओ फ्रिक्वेन्सी सोडली जात असते व यामुळे मनावर आणि शरीरावर वाईट परिणाम होतो.
शरीरातील यामुळे होणारे काही बदल गंभीर आजारांना कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तुम्ही सकाळी मॉर्निंग वॉक करायला जात असाल तरी मोबाईल दूर ठेवणे गरजेचे आहे. रात्रीच्या वेळी जर मोबाईलचा वापर जास्त कराल तर दिवसभर तुम्हाला थकवा,
अशक्तपणा आणि निराश वाटण्याची शक्यता असते. तसेच मोबाईल मधून निघणाऱ्या रेडिएशन मुळे अल्झायमर सारखे विकार देखील होऊ शकतात. तसेच कर्करोग व इतर घातक रोग होण्याचा धोका वाढतो.
तसेच फोन उशी जवळ ठेवल्याने तुमच्या शरीरात स्ट्रेस हार्मोन्स वाढतात व त्यामुळे निद्रानाश आणि इतर मानसिक स्वरूपाचे आजार होऊ शकतात. अपुरी झोप झाल्यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा होत नाही. अशा प्रकारच्या अनेक समस्या यामुळे उद्भवतात.