रात्री निवांत झोप हवी असेल तर झोपण्यापूर्वी फक्त ‘हा’ पदार्थ खा! लागेल शांत झोप आणि मिळतील अनेक फायदे…

Health Tips:- रात्री निवांतपणे झोप लागणे हे अनेक दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. एकूण शरीराच्या उत्तम आणि सुदृढ आरोग्याकरिता झोप महत्वाची आहेच.परंतु दुसऱ्या दिवशी ताजेतवाने वाटून जोमाने आणि उत्साहाने कामाला सुरुवात करण्यासाठी देखील झोपेची आवश्यकता असते.

परंतु रात्रीच्या वेळेस व्यवस्थित झोप लागत नसेल तर याचे अनेक विपरीत परिणाम शरीरावर होण्याची शक्यता असते व कामाच्या ठिकाणी देखील नकळत काही चुका होण्याची आणि कामावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे रात्री तणाव रहीत आणि निवांतपणे झोप लागणे खूप गरजेचे आहे.

झोपेच्या बाबतीत बघितले तर झोपे अगोदर म्हणजेच रात्री आपण जो काही आहार घेतो त्याचा देखील मोठा प्रभाव रात्रीच्या झोपेवर होत असतो. याबाबत आहार तज्ञ म्हणतात की, चांगल्या आरोग्यासाठी आणि रात्री शांत झोप हवी असेल तर रात्री हलका आहार घ्यावा.

तसेच जेवण केल्यानंतर थोडा वेळ बाहेर फिरायला जाणे आणि झोपण्याची वेळ यामध्ये कमीत कमी तीन तासांचे अंतर असणे देखील गरजेचे असल्याचे म्हटले जाते. परंतु या सगळ्या व्यतिरिक्त जेवण केल्यानंतर आपण झोपण्याअगोदर कोणता पदार्थ खावा? हे तुम्हाला माहीत असतं तितकच गरजेचे आहे.जेणेकरून तुम्हाला निवांत झोप लागू शकेल व इतर आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील ते फायद्याचे आहे.

रात्रीच्या जेवणानंतर आणि झोपण्या अगोदर कोणता पदार्थ खावा?
तुम्हाला जर आरोग्यविषयक जास्तीचा फायदा हवा असेल व चांगली झोप लागावी अशी इच्छा असेल तर तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर बडीशोप खाऊ शकतात. बडीशोप जरी सर्वसामान्य पदार्थ वाटत असला तरी रात्रीच्या जेवणानंतर बडीशेप खाण्याची सवय ही अनेक दृष्टीने खूप फायद्याचे ठरते.

आपल्याला माहित आहे की रात्रीचे जेवण जेव्हा आपण करतो तेव्हा बऱ्याच जणांना ऍसिडिटीचा किंवा गॅसेसचा त्रास होतो. त्यामुळे नक्कीच या दोन्ही गोष्टींचा विपरीत परिणाम हा झोपेवर होत असतो. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही बडीशेप खाल्ली तर ते फायदेशीर ठरू शकते. बडीशेप खाल्ल्यामुळे गॅस्ट्रिक एंजाइम तयार व्हायला मदत होते.

त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होते व बडीशोप मेलाटोनिन सारख्या झोपेला प्रोत्साहन देणारे जे काही महत्त्वाचे हार्मोन्स आहेत ते तयार करण्यामध्ये देखील महत्त्वाची भूमिका पार पाडते. त्यामुळे बडीशेप खाल्ल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर आणि चांगल्या पद्धतीची झोप लागते.

तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी देखील बडीशेप आहे फायद्याची
चांगल्या झोपेसाठीच नाही तर रात्रीच्या वेळी जर ताणतणावामुळे तुम्हाला झोपेची समस्या येत असेल व तुम्ही त्रस्त असाल तर बडीशेप खाणे हे फायद्याचे ठरू शकते.

यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात व नैसर्गिक फायटोकेमिकल्स देखील असतात. या दोन्ही गोष्टी मनावरील तणाव कमी करण्यासाठी मदत करतात व शरीरातील कोर्टीसोलची पातळी कमी करतात. या सगळ्या परिस्थितीमुळे तणाव कमी होतो व आराम मिळतो.

शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी फायदेशीर म्हणजे शरीराचे डिटॉक्सिफिकेशन व्हायला करते मदत
रात्रीच्या वेळी जेवणानंतर बडीशेप खाल्ली तर शरीरातील विषारी पदार्थ शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी मदत होते. कारण बडीशोपमध्ये हा गुणधर्म असतो.

अशाप्रकारे शरीराचे डिटॉक्सिफिकेशन झाल्यामुळे आरोग्यावर चांगले परिणाम होतात व आरोग्य चांगले ठेवण्यासाठी यामुळे मदत होते. तसेच यामुळे त्वचा देखील चांगली राहते व बडीशेपमध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म असल्याने श्वासाची दुर्गंधी देखील कमी व्हायला मदत होते.