फक्त एक छोटासा उपाय दातांचा पिवळेपणा करेल दूर आणि दात चमकतील मोत्यासारखे! करून तर बघा

प्रत्येक व्यक्ती जेव्हा समाजामध्ये वावरत असतो तेव्हा तो त्याच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाकडे प्रामुख्याने लक्ष देत असतो व आपले व्यक्तिमत्व आकर्षक कसे दिसेल याबाबतीत आपल्याला प्रयत्न करताना दिसून येतो. एखाद्याचे व्यक्तिमत्व हे अंतरंगापेक्षा त्याच्या बाह्य रंगावरून जास्त करून ओळखले जाते व यामध्ये अंगावर घातलेले कपडे तसेच केसांची रचना महत्त्वाचे असतेस परंतु दात देखील तितकेच महत्त्वाचे असतात.

Ajay Patil
Published:
health of teeth

Health tips Of Teeth:- प्रत्येक व्यक्ती जेव्हा समाजामध्ये वावरत असतो तेव्हा तो त्याच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाकडे प्रामुख्याने लक्ष देत असतो व आपले व्यक्तिमत्व आकर्षक कसे दिसेल याबाबतीत आपल्याला प्रयत्न करताना दिसून येतो. एखाद्याचे व्यक्तिमत्व हे अंतरंगापेक्षा त्याच्या बाह्य रंगावरून जास्त करून ओळखले जाते व यामध्ये अंगावर घातलेले कपडे तसेच केसांची रचना महत्त्वाचे असतेस परंतु दात देखील तितकेच महत्त्वाचे असतात.

तुमचे दात जर चमकदार पांढरे शुभ्र असतील तर व्यक्ती दिलखुलास कुणाशीही बोलू शकतो किंवा खळखळून हसू शकतो. परंतु याच दातांवर जर पिवळेपणा असेल तर व्यक्तीच्या बोलण्यावर आणि खळखळून हसण्यावर देखील त्याचा विपरीत परिणाम दिसून येतो.

दुसरे म्हणजे जर दातांची योग्य काळजी घेतली नाही तर श्वासाला दुर्गंधी येण्याची शक्यता असते व यामुळे तर इतरांशी बोलणे खूप अवघड होते. अनेक प्रकारच्या तंबाखूजन्य व्यसनांमुळे दातांचा पिवळेपणा वाढायला लागतो किंवा दातांची समस्या निर्माण होते.

अशाप्रकारे जर दातांचा पिवळेपणा असेल व तो जर तुम्हाला घालवायचा असेल तर या लेखामध्ये आपण एक छोटीशी टिप्स बघणार आहोत. जी दातांचा पिवळेपणा दूर करण्याला मदत करेल.

नारळाचे तेल ठरेल उपयुक्त
जर तुम्हाला देखील दातांचा पिवळेपणा आणि दात किडण्याचे समस्या असेल व त्यामुळे तुम्ही त्रस्त झाला असाल तर नारळाचे तेल त्यावर उपयुक्त ठरते.

नारळाच्या तेलाचा वापर केला तर तोंडातील अनावश्यक घटक अगदी सहजपणे साफ करणे शक्य होते व दातांचा पिवळेपणा देखील लगेचच दूर होण्यास मदत होते.

दातांवर जर नारळाचे तेल लावले तर दातांची स्वच्छता अतिशय चांगल्या पद्धतीने होते व त्यासोबतच हिरड्यांचे आरोग्य देखील चांगले राहते.

दातांवर कशा पद्धतीने करावा नारळ तेलाचा वापर?
याला ऑइल पुलिंग असे म्हणतात व तुम्हाला जर ऑइल पुलिंग करायचे असेल तर या करता एक ते दोन चमचे नारळाचे शुद्ध तेल घ्यावे व ते तेल दहा ते पंधरा मिनिटे तोंडामध्ये चांगल्या पद्धतीने फिरवावे.

फिरवताना ते तोंडाच्या प्रत्येक ठिकाणी जाईल याची काळजी घ्यावी. काही वेळानंतर ते थुंकून द्यावे व अशा पद्धतीचा उपाय तुम्ही दररोज केला तर तोंडातील अपायकारक जिवाणू नाहीसे होतातच.परंतु जर कुजवलेले अन्नकण अडकलेले असतील तर ते देखील स्वच्छ होण्यास मदत होते.

अशा पद्धतीने नारळाच्या तेलाने ऑइल पुलिंग केल्यानंतर कोमट पाणी घ्यावे व त्याने दात स्वच्छ धुवावेत किंवा ब्रश करून घ्यावा. असे जर तुम्ही दररोज केले तर दातांचा पिवळेपणा सहजपणे दूर होण्यास मदत होते.

इतकेच नाही तर हिरड्यांच्या काही समस्या असतील तर त्यापासून देखील उत्तम पद्धतीचा आराम मिळतो. परंतु त्यांच्या संबंधित गंभीर समस्या असतील तर मात्र वैद्यकीय तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe