Kitchen Tips: एकच उपाय पुरेसा ठरेल झुरळांना घराच्या बाहेर पळवायला! डोळ्याला दिसणार नाही झुरळ

Ajay Patil
Published:
kitchen tips

Kitchen Tips:- घरामध्ये आणि प्रामुख्याने स्वयंपाक घरात लाल मुंग्या किंवा झुरळ यांचा प्रादुर्भाव किंवा वावर मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. स्वयंपाक घरामध्ये तर झुरळांचे प्रमाण खूप जास्त प्रमाणावर असते. किचन ट्रॉली किंवा गॅस ओट्याच्या खाली, चपात्या ठेवण्याच्या डब्यामध्ये बऱ्याचदा झुरळ एन्ट्री करतात.

कारण जास्त प्रमाणात जर झुरळांचा प्रादुर्भाव वाढला तर बऱ्याचदा अन्न विषबाधा म्हणजेच फूड पॉइझनिंग होण्याचा धोका संभवतो. तसेच झुरळ फिरून गेलेले किंवा झुरळांनी स्पर्श केलेले अन्न जर आपण खाल्ले तर बऱ्याचदा डोळ्यातून पाणी येणे किंवा इतर ऍलर्जी होण्यासारखे लक्षणे दिसून येतात किंवा त्रास संभवतो.

अशा या झुरळांचा बंदोबस्त करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाययोजना करत असतो. बऱ्याचदा केमिकल युक्त अशा स्प्रे चा वापर देखील आपण करतो. परंतु यामुळे झुरळ पूर्णपणे घराच्या बाहेर जातील किंवा त्यांचा नायनाट होईल असे दिसून येत नाही. तसेच केमिकल युक्त स्प्रे च्या वापराने एलर्जी  होण्याचा देखील धोका संभवतो.

त्यामुळे या व्यतिरिक्त जर काही घरगुती उपाय करून जर झुरळांचा बंदोबस्त करता येत असेल तर उत्तम ठरते. याच दृष्टिकोनातून या लेखांमध्ये आपण झूरळाचा बंदोबस्त करण्यासाठी महत्त्वाचे असलेले काही घरगुती उपाय पाहणार आहोत.

 झुरळांच्या बंदोबस्तासाठी करा हे घरगुती उपाय

1- काळी मिरीचा वापर झुरळांचा जर बंदोबस्त करायचा असेल तर त्याकरिता एका वाटीमध्ये काळी मिरी घ्यावी. त्यानंतर तिला व्यवस्थित बारीक करून घ्यावे व तिची पावडर बनवून घ्या. काळी मिरीच्या या पावडरमध्ये कापूर घालून तिला बारीक करून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये टूथपेस्ट आणि टाल्कम पावडर टाकावी व एक लसूण किसून त्यामध्ये टाकून द्यावा.

हे सगळे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावे व घराच्या कोपरा तसेच खिडक्यांजवळ, दरवाज्यांच्या मागे आणि किचनच्या कोपऱ्यामध्ये चमच्याच्या साह्याने लावून घ्यावे. या मिश्रणामध्ये जे काही पदार्थ वापरलेले असतात त्यांच्या तीव्रवासामुळे झुरळ झटक्यात घराबाहेर पडतात. कमी वेळामध्ये आणि कमी खर्चात चांगला परिणाम देणारा हा उपाय आहे.

2- कडुलिंबाचा वापर कडूलिंबा मध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे झुरळांच्या त्रासापासून तुम्हाला सुटका हवी असेल तर कडुलिंबाची पाने खूप उपयुक्त ठरतात. या पानांमध्ये असणाऱ्या कीटकनाशक गुणधर्म हे खूप गुणकारी ठरतात. याकरिता तुम्ही कडुलिंबाचे तेल किंवा कडुलिंबाची पावडरचा वापर करू शकतात. म्हणजे स्वयंपाक घरामध्ये किंवा घरातील इतर भागांमध्ये ज्या ठिकाणी झुरळ लपण्याची शक्यता असते त्या ठिकाणी जर तुम्ही रात्री झोपण्याआधी या तेलाचा फवारा केला तर याच्या वासाने झुरळ लांब राहतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe