Health Tips: एक दिवसाचा उपवास तुमचे शरीर आतून स्वच्छ ठेवण्यासाठी आहे महत्त्वाचा! वाचा सद्गुरूंनी काय दिली माहिती?

Health Tips

Health Tips:- आजकालची धावपळीची जीवनशैली आणि आहारामध्ये झालेला विलक्षण बद्दल यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. सध्याच्या जीवनशैलीमध्ये व्यक्ती जंक फुड तसेच तेलकट पदार्थांचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर करतात.

त्यामुळे पचनासंबंधीच्या आणि आतड्यांचे अनेक विकार उद्भवण्याची दाट शक्यता असते. तसेच बऱ्याच व्यक्तींचे काम हे बैठे काम असल्यामुळे शरीराचा व्यायाम पुरेसा होत नाही.मात्र आहार किंवा जेवण आपण एक दिवस देखील सोडत नाही.

या सगळ्या बाबींचा परिणाम हा शरीरावर होतो व सतत आजारी पडण्याची समस्या उद्भवू शकते. या सगळ्या दैनंदिन जीवन किंवा आहाराचा परिणाम हा पोटात आणि आतड्यांमध्ये घाण साचण्यात देखील होत असतो. आतड्यांमध्ये किंवा शरीरामध्ये घाण वाढली की पचनाशी संबंधित समस्या उद्भवतात.

या सगळ्या गोष्टीच्या घरातून बाहेर येण्यासाठी किंवा या समस्या टाळण्यासाठी नेमके आपण काय करावे याबद्दल सद्गुरूंनी बहुमोल मार्गदर्शन केले आहे. त्याचीच माहिती या लेखात घेऊ.

काय म्हणतात याबद्दल सद्गुरु?

शरीराच्या एकंदरीत प्रक्रियेबद्दल बोलताना सद्गुरु म्हणतात की 40 ते 48 दिवसांनी शरीर प्रणाली एका विशिष्ट चक्रामधून जात असते. यावेळी अशा प्रणाली मधून शरीर जात असताना त्यातील तीन दिवस अशा पद्धतीचे असतात की त्या दिवसांमध्ये शरीराला कुठल्याही प्रकारच्या अन्नाची आवश्यकता भासत नाही.

ज्या दिवसांमध्ये शरीराला अन्नाची गरज नसते तेव्हा जर तुम्ही तुमच्या शरीराला समजून घेऊन खाणे पिणे टाळले तर तुमची शरीरांतर्गत व्यवस्था तुम्ही चांगल्या पद्धतीने सुधारू शकतात. या सगळ्या करिता तुम्ही महिन्यातून एक दिवस तरी उपवास करणे खूप गरजेचे आहे. सद्गुरूंच्यामते तुम्ही उपवास केला तर तुमच्या शरीरामध्ये जे काही नको असलेले पदार्थ किंवा घाण साचलेली असते ती घाण साफ होण्यास मदत होते व शरीराची संपूर्ण यंत्रणा सुधारते.

उपवासाचे शरीराला होतात हे फायदे

दररोज शरीरामध्ये अन्नाचा दबाव टाकणे देखील योग्य नाही. त्यामुळे एक दिवस उपवास करणे खूप आवश्यक आहे. समजा तुम्ही उपवास करू शकत नसाल तर त्या दिवशी दुसरे अन्न न घेता फक्त फळांचा रस सेवन करणे गरजेचे आहे.

कारण फळांच्या रसामुळे तुम्हाला तुमची शरीर प्रणाली हाताळण्यास मदत होते एक दिवस उपवास केल्यामुळे तुमची प्रणाली स्वच्छ होते. जर तुम्हाला शरीरातील वेदना आणि समस्यांपासून जर मुक्तता हवी असेल तर एक दिवस उपवास केला पाहिजे. उपवास केल्यामुळे शरीराची शुद्धी होते आणि शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

शरीर निरोगी असेल तर तुमचे मन देखील शांत होते. शरीर निरोगी ठेवण्याकरिता उपवास करणे खूप आवश्यक आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे दोन जेवणाच्या अंतरामध्ये आठ तासांचा गॅप ठेवणे गरजेचे आहे. कमीत कमी पाच तासांचा तरी ब्रेक हवाच हवा.

उपवास हा एक उत्तम मार्ग असून मूत्रपिंड व यकृताच्या आरोग्यासाठी देखील खूप महत्त्वाचा आहे. उपवासामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. तुम्ही जर जास्त कालावधी करिता उपवास करू शकत नसाल तर त्याऐवजी जास्त पाणी पिणे किंवा फळांचा रस सेवन करणे इत्यादी उपाय देखील महत्त्वाचे ठरतात.

उपवासाचे अन्य फायदे

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील उपवास फायदेशीर आहे. परंतु यामध्ये जर रक्तातील साखरेमध्ये जर जास्त प्रमाणात चढ-उतार होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपवास करावा. तसेच वाढते वजन कमी करण्याकरता देखील उपावास हा रामबाण उपाय आहे.

उपवास करताना देखील एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे की हलका आणि द्रव्य आहार घेणे फायदेशीर ठरते. उपवासामध्ये तुम्ही फळे किंवा सकस आहार घेतला तर तुमचे वजन कमी होण्यास देखील मदत होते.

अशा पद्धतीने उपवासाचा अवलंब करून तुम्ही शरीरातील अंतर्गत प्रणाली मजबूत ठेवून निरोगी आयुष्य जगू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe