H5N1 बर्ड फ्लू कोरोनापेक्षा जास्त आहे धोकादायक? काय असतात याची लक्षणे? मानवामध्ये पसरतो का याचा संसर्ग? वाचा ए टू झेड माहिती

Published on -

एखाद्या संसर्गजन्य आजाराची साथ म्हटली म्हणजे अंगावर काटा उभा राहतो. कारण कोरोना महामारीने अशा प्रकारच्या संसर्गजन्य साथीच्या आजारांमुळे काय परिस्थिती ओढवू शकते हे अख्ख्या जगाने अनुभवले. अजून देखील या धक्क्यातून नीटसे सावरता येत नसून जग कोरोना महामारीतून आताशी कुठे हळूहळू बाहेर निघताना दिसून येत आहे.

त्यातच आता एव्हीयएन इनफ्लूअंझा साथीचा धोका जगाला निर्माण झाल्याची स्थिती आहे. त्यालाच आपण बर्ड ब्ल्यू असे देखील म्हणतो. या विषाणूचे साधारण प्रकारे ए, बी, सी, डी असे चार प्रकार पडतात. या व्हायरसचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा मानवांना संक्रमित करत नाही.

परंतु यातीलA(H5N1) आणि A(H7N9) द्वारे मानवाला संक्रमण होण्याचा धोका संभवतो. आतापर्यंत या रोगाची लागण पाळीव व जंगली पक्षांना झाली.परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये अमेरिकेत शेळ्या आणि काही गुरांमध्ये देखील बर्ड फ्लू संसर्गाचे प्रकरणे समोर आलेले आहेत व विशेष म्हणजे गाय आणि शेळी सारख्या सस्तन प्राण्यांमध्ये H5N1 आढळून आल्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे बर्ड फ्लू  बद्दलची माहिती या लेखात घेऊ.

H5N1 बर्ड फ्लू म्हणजे काय?

हा एक विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून तो प्रामुख्याने कबूतर, कोंबडी तसेच तितर व टर्की सारख्या पक्षांमध्ये प्रामुख्याने दिसून येतो. हा विषाणू ज्या पक्षांना संक्रमण झालेले असते त्यांची विष्टा, अशा पक्षांचे डोळे, नाक किंवा तोंडातून जो काही द्रव्य येतो त्यामध्ये आढळून येतो.

त्यामुळे अशा संक्रमित प्राणी किंवा पक्षाच्या संपर्कामध्ये एखादी व्यक्ती बराच कालावधीपर्यंत असेल तर त्याला या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. बर्ड फ्लू साधारणपणे लोकांना थेटपणे संक्रमित करत नाही. परंतु काही कारणांमुळे बर्ड फ्लू होण्याची शक्यता वाढते. जसे की..

1- जर संक्रमित जिवंत किंवा मृत पक्षी किंवा प्राणी असेल व त्यांच्यासोबत काम केल्यानंतर त्यांचे डोळे किंवा नाक आणि तोंडाला स्पर्श केल्यामुळे लागण होण्याची शक्यता वाढते.

2- ज्या ठिकाणी बर्ड फ्लू संक्रमित पक्षी किंवा प्राण्याचे ठिकाण आहे अशा ठिकाणी गेल्यानंतर किंवा भेट दिल्यानंतर

3- एवढेच नाही तर दवबिंदू जर व्हायरसने दूषित झालेला असेल किंवा व्हायरसने दूषित झालेली धूळ असेल व त्या ठिकाणी श्वास घेतला गेला तरी देखील संक्रमण होऊ शकते.

4- या आजाराने संक्रमित असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे देखील होऊ शकतो. परंतु याबद्दलची शक्यता खूपच कमी असल्याचे समोर आले आहे.

 काय असतात बर्ड फ्लूची लक्षणे?

H5N1 बर्ड फ्लूची लक्षणे बघितली तर साधारणपणे श्वास घ्यायला त्रास होणे, किंवा खोकल्याचा त्रास होणे व गंभीर स्वरूपाचा निमोनिया पर्यंत याचे लक्षणे जाऊ शकतात. परिस्थिती जर सिरीयस झाली तर संसर्ग झालेल्या व्यक्तीला पक्षाघाताचा झटका येण्याची शक्यता असते किंवा मृत्यू देखील होऊ शकतो.

तरी देखील जर आपण याची साधारणपणे लक्षणे पाहिली तर मळमळ किंवा उलटी, सर्दी खोकला, डोकेदुखी, थकवा जाणवणे, अकारण भीती वाटणे, गळ्यात खवखवणे, मांसपेशीमध्ये दुखायला होणे तसेच श्वास घ्यायला त्रास व नाक बंद होणे इत्यादी  लक्षणे दिसून येतात.

 बर्ड फ्लू होऊ नये याकरिता काय काळजी घ्यावी?

1- ज्या ठिकाणी वन्यजीव किंवा पक्षी राहतात अशा ठिकाणी भेट दिल्यानंतर हात नेहमी स्वच्छ धुणे गरजेचे आहे.

2-H5N1 संसर्गाचा धोका कमी करायचा असेल तर पोल्ट्री फार्म मध्ये जेव्हा काम कराल तेव्हा हात मोजे पूर्ण हात झाकले जातील म्हणजे पूर्ण बाही असलेले कपडे घालणे गरजेचे आहे.

3- जेव्हा तुम्ही काम संपवून हातमोजे काढाल तेव्हा हात सॅनिटायझरने चांगले धुऊन घ्यावेत. सॅनिटायझर नसेल तर तुम्ही साबण व पाण्याचा वापर करून हात स्वच्छ करू शकतात.

4- घरामध्ये जर एखादा पाळीव प्राणी असेल तर त्याला इतर पक्षी, वन्यजीव आणि त्यांच्या विष्टे पासून दूर ठेवणे गरजेचे आहे.

 कोणत्या लोकांना आहे याचा सर्वाधिक धोका?

जे व्यक्ती सामान्यपणे पक्षी किंवा प्राण्यांसोबत काम करतात जसे की, पशुवैद्य, शेतकरी, कृषी उद्योग क्षेत्रातील तज्ञ इत्यादी व्यक्तींना याचा धोका असतो.

याशिवाय जे व्यक्ती पोल्ट्री फार्म किंवा जनावरांच्या बाजारामध्ये जातात. अशा व्यक्तींना देखील याचा संसर्ग होण्याची शक्यता बळावते. या रोगाची मानवामध्ये आढळून आलेली पहिली केस 1997 मध्ये नोंदवली गेली होती. हॉंगकॉंगमधील पोल्ट्रीमध्ये या व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे एकूण 18 लोकांना याचा संसर्ग झाला होता व त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe