Health Tips: तुम्हीही तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिता का? तर हे वाचा!नाहीतर….

Ajay Patil
Published:
health tips

Health Tips:- भारतामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये अगोदर वेगवेगळ्या प्रकारची तांब्याची भांडी असायची. त्यामध्ये पाणी पिण्याच्या ग्लासापासून तर छोट्या वाट्या, जेवणाच्या प्लेट या देखील तांब्याच्या असायच्या. परंतु कालांतराने यामध्ये बदल होत तांब्याच्या भांड्यांची जागा आता मोठ्या प्रमाणावर स्टीलच्या भांड्यांनी घेतलेली आहे.

म्हणजेच आता ग्लासापासून तर आवश्यक असणारी स्वयंपाकासाठीचे भांडे तसेच प्लेट स्टील पासून बनवलेले असतात. परंतु आज देखील जर आपण ग्रामीण भागाचा विचार केला तर बऱ्याच घरामध्ये तांब्याची भांडी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात.

त्यातल्या त्यात जर आपण तांब्याच्या ग्लासमध्ये किंवा तांब्याच्या एखाद्या भांड्यामध्ये पाणी पीत असू तर ते आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप फायद्याचे समजले जाते. यामध्ये जर तुम्ही तांब्याच्या भांड्यात पाणी पीत असाल तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते

पचनशक्ती देखील सुधारते. परंतु यामध्ये पाहिले तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे खूप चांगले आहे. परंतु कुठल्याही चांगल्या गोष्टीला एक वाईट बाजू देखील असते हे सत्य आहे. याच दृष्टिकोनातून पाहिले तर तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे फायदेशीर जसे आहे

तसेच जर तुम्ही पाणी पिताना काही चुका केल्या तर त्या नुकसानदायक देखील ठरू शकते. म्हणून तुम्ही जर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पीत असेल तर काही गोष्टी टाळणे खूप गरजेचे आहे. यासंबंधीचीच महत्त्वाची माहिती या लेखात घेऊ.

 तांब्याच्या भांड्यात पाणी प्या परंतु या चुका टाळा

1- आपल्यापैकी बरेच जण तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी हे सकाळी उठून पितात. परंतु बरेच व्यक्ती तांब्याच्या भांड्यातील पाणी दिवसभर पितात. पण दिवसभर तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ नये व तुम्ही जर असे करत असाल तर नुकसान होऊ शकते. म्हणजेच दिवसभर जर तुम्ही हे पाणी पिले तर शरीरामध्ये कॉपरचे प्रमाण वाढते व त्यामुळे तुम्हाला पोटदुखी तसेच चक्कर येणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. इतकेच नाही तर किडनीला देखील समस्या निर्माण होण्याची शक्यता असू शकते.

2- तसेच तुम्ही तांब्याच्या भांड्यात पाणी पीत असेल तर चुकूनही त्यामध्ये लिंबू मिसळून पाणी पिऊ नका. जर तुम्ही असे कराल तर पोटदुखी तसेच गॅस आणि उलट्या होण्याची शक्यता असते.

3 तसंच तांब्याच्या भांड्यात पाणी पिल्यामुळे काही जणांना ऍसिडिटीची समस्या देखील येऊ शकते. त्यामुळे हे पाणी जास्त प्रमाणात पिऊ नये.

4- दुसरी बाब म्हणजे जर तुम्ही तांब्याच्या भांड्यामध्ये एखादी आंबट वस्तू ठेवली तर अन्नातून विषबाधा होण्याची धोका देखील संभवतो.

5- जर काही व्यक्तींना किडनी किंवा हृदयाच्या संबंधित समस्या असतील तर अशा रुग्णांनी तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

6- समजा तुम्ही तांब्याच्या बाटलीचा पाणी पिण्यासाठी वापर करत असाल तर तिला तीनदा आठवड्यामधून स्वच्छ करून घ्यावे.

7- तांब्याची भांडी व्यवस्थित स्वच्छ करूनच त्यांचा वापर करणे फायद्याचे आहे. तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मिठाचा वापर करून ते स्वच्छ करू शकतात.

8- महत्वाचे म्हणजे तुम्ही चुकून देखील तांब्याच्या भांड्यामध्ये लिंबू किंवा मध मिसळू नका. कारण या दोन्ही पदार्थांमुळे विष बनू शकते किंवा विषबाधा होऊ शकते व आरोग्याला हानी पोहचू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe