ब्राझील :- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक मागणी केलेल्या औषधाचे दुष्परिणाम आता पुढे येऊ लागले आहेत. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनमुळे रुग्णांच्या हृदयाच्या ठोक्यात अनियमितता दिसून आल्याचे ब्राझीलने आपल्या छोटेखानी अहवालात स्पष्ट केले.
मनौस येथील रुग्णालयात कोरोनाबाधित ८१ जणांवर हा प्रयोग करण्यात आला. यातल्या निम्म्या रुग्णांना सलग पाच दिवस दिवसातून दोन वेळा क्लोरोक्वीन देण्यात आले. ४५० मिलीग्रॅमची मात्रा प्रत्येक डोसमध्ये होती.
काही जणांना ६०० मिलीग्रॅमची मात्रा देण्यात आली. जास्त प्रमाणावर डोस शरीरात गेल्यानंतर या रुग्णांना तीन दिवसांनंतर खूपच त्रास होत असल्याचे दिसू लागले. या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे दिसले.
त्यांच्या हृदयाच्या ठोक्यात अनियमितता दिसून आली. सहाव्या दिवशी यातले ११ रुग्ण दगावले. औषधाची मात्रा जास्त वाढविल्यानंतर रुग्णांना त्रास होत असल्याचे डॉ. डेव्हिड ज्युरलिंक यांनी सांगितले.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®