Teeth Whitening Remedies: करा ‘हा’ घरगुती उपाय आणि सात दिवसात पिवळे दात करा चमकदार! वाचा उपायाची माहिती

home remedies for whitening teeth

Teeth Whitening Remedies:- आकर्षक व्यक्तिमत्त्वांमध्ये बाह्य स्वरूपाचा विचार केला तर पांढरे शुभ्र आणि चमकदार दात यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण आपल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये सफेद दातांचे किंवा चमकदार दातांचे खूप मोठा प्रभाव पडत असतो. परंतु बऱ्याचदा तोंडाचे आरोग्य किंवा दातांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि त्यासोबतच जर तंबाखू किंवा गुटखा किंवा इतर धुम्रपान सारख्या सवयी असतील तर दातांवर पिवळेपणा दिसायला लागतो.

दातांवर जरासा पिवळेपणा जास्त प्रमाणात दिसायला लागला तरी सामाजिक जीवनात वावरताना देखील आपल्याला बऱ्याचदा संकोचल्यासारखे होते. दातांवर जरासा पिवळा थर साचला तर तो कमी करण्याकरिता आपण बऱ्याच पद्धतीचे उपाययोजना करतो. दिवसातून दोन वेळा देखील ब्रश करतो परंतु तरी देखील पिवळेपणा कमी होताना दिसून येत नाही. जर आपण शोध घेतला तर दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठीचे अनेक उपाय आपल्याला इंटरनेटवर दिसून येतात.

असे वेगळ्या पद्धतीचे उपाय ऐकून आपण मोठ्या प्रमाणावर गोंधळात पडतो. परंतु या व्यतिरिक्त जर तुम्ही घरगुती काही नैसर्गिक उपायांचा वापर केला तर नक्कीच पिवळे दात पांढरे शुभ्र चमकवण्याकरिता खूप मोठा फायदा होऊ शकतो. याच दृष्टिकोनातून तुम्ही घरात वापरल्या जाणाऱ्या हळदीचा वापर करून दात मोत्यासारखे चमकू शकतात. याबद्दल न्यू माउथ ने दिलेला अहवाल असून त्यानुसार आपण हळदीचा वापराबद्दल माहिती घेऊ.

 हळदीचा वापर केला तर दातांवर त्याचा परिणाम कसा होतो?

हळदीचा वापर आणि दात यासंबंधी अनेक अभ्यास करण्यात आलेली असून त्या माध्यमातून सांगण्यात आले आहे की टूथ व्हाईटनिंग म्हणून हळदीचा वापर याचे समर्थन करणारे कुठलेही संशोधन सध्या

नाही. परंतु हळदीचे जे काही उपचाराकरिता वापर केला जातो त्याकरिता हळदीमध्ये असलेली कर्क्युमिनचे आरोग्याला होणारे फायदे महत्त्वाचे आहेत व यात करक्युमिनच्या साह्यानेच तोंडाचे आरोग्य सुधारू शकते असा दावा करण्यात येतो. तोंडाच्या उत्तम आरोग्या करीता हळदीचा वापर फायदेशीर ठरू शकतो. तोंडाचे आरोग्य म्हणजेच ओरल हेल्थ करीता हळदीचा वापराचा फायदे जर पाहिले तर ते पुढील प्रमाणे आहेत…

1- हळदीमध्ये असलेले अँटिऑक्सिडेंट मुक्त रॅडिकल्स पासून पेशिंचे नुकसान टाळते व हळद विरोधी असल्यामुळे जळजळ कमी होते.

2- त्यामध्ये असलेली प्रतिजैविके हे जिवाणू तसेच बुरशी आणि परजीवी सारख्या सूक्ष्मजंतूची वाढ होण्यापासून अटकाव करतात.

3- दात आणि हिरड्यांना मसाज करण्यासाठी ग्राउंड आणि भाजलेली हळद वापरली तर जळजळ आणि सूज कमी होऊ शकते. जास्त वेदना होत असेल तर डॉक्टरांकडे जाणे महत्वाचे आहे असे देखील या क्षेत्रातील तज्ञ म्हणतात. परंतु तात्पुरत्या स्वरूपात हिरड्या किंवा दात मधील वेदना कमी करण्याकरिता हळदीचा वापर करता येणे शक्य आहे.

 पिवळ्या दातांसाठी हळदीचा वापर कशा पद्धतीने करावा?

1- याकरिता नारळाच्या तेलामध्ये हळद मिक्स करावी आणि नंतर ती दातावर लावावी. काही कालावधी करिता ती तसीच ठेवावी व नंतर ब्रशने स्वच्छ करून आणि चूळ भरावी. श्वासाची दुर्गंधी येत असेल तर ती दूर करण्याकरिता आणि पिवळेपणा दूर करण्याकरता याचा फायदा होतो. साधारणपणे सात दिवस तुम्ही हा उपाय केल्यास तुमचे दात पांढरे शुभ्र होतात.

2- याशिवाय तुम्ही बेकिंग सोडा किंवा हळद पावडर आणि नारळाचे तेल एकत्रित करून त्याची पेस्ट दातांवर लावू शकता. याची चव तुम्हाला खूप खराब लागेल. दात लवकर सफेद होण्यासाठी तुम्हाला खूप मोठा फायदा मिळेल.  याशिवाय तुम्हाला शक्य असेल तर हे मिश्रण दातांवर लावल्यावर दात ब्रशने व्यवस्थित घासा आणि नंतर व्यवस्थित चूळ भरा. हा उपाय सात दिवस करा.

( कुठलाही उपचार करायचा असेल किंवा कोणत्याही पदार्थांचा वापर करायचा असेल तर वैद्यकीय तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा व त्यानुसारच उपाय करावा.)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe