महिलांच्या मृत्यूदरात होणार लक्षणीय घट ! बायपास सर्जरी ठरली संजीवनी

Published on -

१८ मार्च २०२५ मुंबई : बायपास सर्जरीमध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यांना अडथळयाच्या पुढे पर्यायी रक्तवाहिन्या जोडून पुरेसे रक्त पुढील भागाला पुरवण्याची व्यवस्था केली जाते. एखाद्याचे अमूल्य जीवन वाचवण्यासाठी हृदयविकारासाठी बायपास शस्त्रक्रिया केली जाते.या शस्त्रक्रियेत अवरोधित किंवा अरुंद धमनीच्या सभोवतालच्या रक्त प्रवाहाचा मार्ग बदलला जातो.

बायपास शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये चांगले परिणाम आणि कमी मृत्यू दर दिसत आहे असे अभ्यासकांना संशोधनातून समजले आहे. पुनर्प्राप्ती दरम्यान महिलांना वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागते, यामध्ये मानसिक परिणामांचाही समावेश असतो असे आरोग्य तज्ज्ञ सांगत आहे.

बायपास शस्त्रक्रियेमुळे जीवनाची गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारते आणि हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका सुद्धा कमी होतो.तंत्रज्ञान आणि शस्त्रक्रियेच्या तंत्रांच्या प्रगतीमुळे, बायपास शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचा दर वाढत चालला आहे.

गंभीर कोरोनरी धमनीचा विकार असलेल्या रुग्णांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरतोय.बायपास शस्त्रक्रिया कमीतकमी जोखीम असलेली जसे की रोबोटिक सहाय्यक प्रक्रिया,ज्यामुळे पुनर्प्राप्तीचा कालावधी कमी होतो आणि गुंतागुंत होण्याचा धोका टाळता येतो.

गंभीर हृदयविकार असलेल्या लोकांना बायपास शस्त्रक्रिया हा एक महत्त्वाचा उपचार पर्याय उपलब्ध आहे,तसेच हृदयाच्या आरोग्याचे रक्षण हा प्रतिबंधात्मक उपाय आहे. बायपास शस्त्रक्रिया करणाऱ्या महिला रुग्णांसाठी योग्य उपचार मिळण्यासाठी डॉक्टरांनी लक्ष देऊन त्यानुसार उपचार योजना आखायला पाहिजे.

या विशिष्ट गरजा आणि महिलांना भेडसावणाऱ्या अडचणीनुसार योग्य उपचार दिले गेले पाहिजे.बायपास शस्त्रक्रिया झाल्यानंतर शरीर कमकुवत वाटू शकते, त्यामुळे वैद्यकीय सल्ल्याने हालचाली हळूहळू सुरू केल्या पाहिजेत. बराच वेळ एका जागी उभे राहणे टाळा, वेळोवेळी थोडे फिरू शकता.

शस्त्रक्रिया झाल्यानंतर, चालणे हा फुफ्फुस आणि हृदयासाठी चांगला व्यायाम आहे. आपण हळूहळू चालायला सुरुवात करू शकता, असे सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे सल्लागार कार्डियाक सर्जन डॉ. बिपीनचंद्र भामरे यांनी सांगितले.

कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग (सीएबीजी) ही स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे.अलीकडील अभ्यासांनी महिलांमधील सीएबीजीशी विचार आणि परिणामांवर प्रकाश टाकला आहे.

संशोधनातून असे लक्षात आले आहे कि,पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना हृदयविकाराची भिन्न लक्षणे दिसून येऊ शकतात,ज्यामुळे निदान आणि उपचारांना उशीर होतो.शिवाय महिलांमध्ये लहान कोरोनरी धमन्या असतात, ज्यामुळे शस्त्रक्रियेच्या परिणामांवर आणि रोगनिदानांवर परिणाम होऊ शकतो.

महिला कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंगला कसा प्रतिसाद देतात यात हार्मोनल घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. एस्ट्रोजेनचे कार्डिओप्रोटेक्टिव्ह प्रभाव असल्याचे दर्शवले गेले आहे, जे महिला रुग्णांमध्ये पुनर्प्राप्ती आणि शस्त्रक्रियेच्या एकूण यशावर परिणाम करू शकतात. महिलांनी विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि वेळीच उपचार घ्यावा हे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe