शरीराच्या उत्तम आरोग्याकरिता संतुलित आहार आणि त्यासोबत व्यायाम खूप गरजेचा असून त्यामुळे नियमितपणे व्यायाम करणे खूप महत्त्वाचे आहे. व्यायामाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर सकाळी मॉर्निंगवॉक व रात्री जेवण झाल्यानंतर चालायला जाणे हे सामान्यपणे बरेच जण करतात.
कारण दररोज काही कालावधीपर्यंत चालणे हे शरीराच्या दृष्टिकोनातून खूप फायद्याचे आहे. योग्य पद्धतीने जर चालण्याचा व्यायाम दररोज केला तर शरीराची चयापचय क्रिया सुरळीतपणे सुरू राहते. आपण जितके वेळ चालतो तितक्या जलद गतीने कॅलरी बर्न होण्याला मदत होते.
साधारणपणे शरीर जर आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला फिट ठेवायचे असेल तर हा सोपा व्यायाम प्रकार आहे.परंतु यासोबत कोणत्या वयातील लोकांना प्रत्येक दिवशी किती पावले चालणे गरजेचे आहे हे देखिल यामध्ये खूप महत्त्वाचे आहे व याबद्दल योग्य माहिती प्रत्येकाला आहे असे नाही.
याबाबत स्वीडनच्या कालमार विद्यापीठातील संशोधकांनी एका अभ्यासात असे म्हटले आहे की, व्यक्तीने चालताना त्याचे वय लक्षात घेऊन चालले तर ते वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवू शकत नाही तर अनेक आजारांवर देखील नियंत्रण ठेवण्यास मदत होते. यासोबत वयानुसार चालण्याची पद्धत अंगीकारली तर हृदय विकार, डायबिटीस तसेच हाय ब्लडप्रेशर सारखे गंभीर आजार तुम्ही नियंत्रणात ठेवू शकतात.
वयानुसार दररोज किती पावले चालावेत?
1- वय सहा ते सतरा वर्ष– या वयोगटातील मुलांनी दररोज 15000 पावले चालावे व मुलींनी 12000 पावले चालावे.
2- वय 18 ते 40- या वयोगटातील व्यक्तींनी दररोज 12,000 पावले चालणे आवश्यक आहे.
3- वय 40 ते 49- या वयोगटातील व्यक्तींनी दररोज 11 हजार पावले चालणे शरीरासाठी फायद्याचे ठरते.
4- वय 50 ते 59- या वयोगटातील लोकांनी दररोज 11000 पावले चालणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरते.
5- वय 60 व त्यापेक्षा अधिक– साठ वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांनी दररोज आठ हजार पावले चालणे गरजेचे आहे.
चालताना वेग किती ठेवावा?
चालताना एक निश्चित वेगमर्यादा सेट करणे खूप गरजेचे आहे. यामध्ये कमीत कमी 100 पावले चालण्याकरिता एक मिनिट किंवा चार ते पाच किलोमीटर प्रति तास इतका वेळ घेणे हे शरीरासाठी आरोग्यदायी आहे. परंतु चालणे व त्याचा वेळ ही बाब व्यक्तीचे वय तसेच त्याचा फिटनेस व एकूण आरोग्य कसे आहे इत्यादी वर अवलंबून असते.
परंतु यामध्ये जितका तुमचा चालण्याचा वेग जास्त असेल तितक्या वेगाने तुमचे वजन कमी करण्यासाठी तुम्हाला सोपे जाते. वजन कमी करण्यासाठी दररोज पाच ते दहा हजार पावले चालणे महत्त्वाचे आहे.