Weight Loss Tips:- आजच्या धकाधकीच्या आणि अत्यंत धावपळीच्या जीवनशैलीमुळे व्यक्तींना अनेक आजारांनी ग्रस्त केलेले आहे. मधुमेह, हृदयरोग तसेच वाढत्या वजनाच्या समस्येने अनेक व्यक्ती त्रस्त आहेत. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी तसेच खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा, जास्त प्रमाणात जंक फूडचे सेवन इत्यादी कारणांमुळे अनेक समस्या उद्भवतात.
यातीलच जास्तीचे वजन असणे ही समस्या बऱ्याच व्यक्तींना असून यामुळे अनेक व्यक्ती त्रस्त आहेत. वजन उतरवण्याकरिता अनेक प्रकारचे उपाययोजना तसेच उपचार देखील केले जातात. परंतु म्हणावं तितका फरक या सगळ्या गोष्टींचा होत नसतो. तसेच जे लोकं वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात ते लोक गव्हाची चपाती खाणे देखील बंद करतात.
लोकांचे असे मत आहे की गव्हाची चपाती खाल्ली तर वजनात वाढ होते. त्यामुळे डायबिटीसचे रुग्ण आणि ज्यांना वजन कमी करायचे आहे अशी व्यक्ती चपाती खाणे बऱ्याचदा टाळताना दिसून येतात. परंतु जर आपण गव्हाच्या पिठामध्ये अन्य काही महत्त्वाच्या पीठांचा समावेश केला तर त्याचा उपयोग हा वजन कमी करण्यासाठी होतो हे देखील तितकच खरे आहे. याबद्दल आहार तज्ञांनी देखील महत्त्वाची माहिती दिली आहे.
या पिठाचा आहारात समावेश करा
1- चण्याचे पीठ– वजन कमी करण्यासाठी बेसनाचा वापर अनेक व्यक्ती आहारामध्ये करतात. यामध्ये झिंक तसेच फोलेट आणि लोह असते. तसेच मुबलक प्रमाणात फायबर व प्रथिने देखील आढळून येतात. यामधील ग्लासेमिक इंडेक्स कमी असते ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
2- ज्वारीचे पीठ– वजन कमी करण्याकरिता ज्वारीचे पीठ हे खूप फायदेशीर आहे. ज्वारीच्या पिठामध्ये कॅल्शियम तसेच लोह, फायबर, प्रथिने व अनेक जीवनसत्वे आढळून येतात. जे पचननक्रियेसाठी खूप उत्तम मानले जाते. एवढेच नाही तर रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास देखील यामुळे मदत होते. गव्हाच्या पिठामध्ये ज्वारीचे पीठ मिसळून तुम्ही चपात्या तयार करून त्यांचा आहारात समावेश करू शकता.
3- शिंगाड्याचे पीठ– आहारामध्ये जर तुम्ही गव्हाच्या पिठात शिंगाड्याचे पीठ मिसळून तयार केलेल्या चपात्यांचा आहारात समावेश केला तर वजन कमी करण्यासाठी याची खूप मोठी मदत होते. शिंगाड्याच्या पिठामध्ये फायबर तसेच जीवनसत्वे, कार्बोहायड्रेट आणि खनिजे जास्त प्रमाणात दिसून येतात. त्यामुळे वजन देखील नियंत्रणात राहते व शरीराला ज्या काही आवश्यक पोषक घटकांची गरज असते त्यांचा देखील व्यवस्थित पुरवठा होतो.
अशा पद्धतीने या तीन पिठाचा आहारात वापर केला तर वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.