Weight Loss Tips: गव्हाच्या पिठामध्ये मिसळा ‘हा’ पदार्थ आणि बनवा चपाती! थोडी देखील वजनात नाही होणार वाढ

Ajay Patil
Published:
chapaties for weight loss

Weight Loss Tips:- वाढत्या वजनाची समस्या बऱ्याच जणांना असते. वजन जास्त वाढल्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या देखील उद्भवतात. अनेक जण वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे उपाययोजना करतात. तसेच आहारामध्ये देखील अनेक पदार्थ खाण्याचे टाळतात.

वेगवेगळ्या पद्धतीचे डाइट्स, एक्सरसाइज याचा अवलंब केला जातो. तसेच वजन कमी करण्यासाठी बऱ्याच प्रमाणात औषधांचा वापर देखील काही जण करताना आपल्याला दिसून येतात. परंतु या उपाययोजना केल्याने बऱ्याचदा वजनामध्ये घट येते.

परंतु कालांतराने मात्र परत वजन वाढायला लागते. वजन वाढल्यामुळे बऱ्याचदा हृदयरोग, रक्तदाब यासारख्या समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये बऱ्याच प्रमाणात पथ्य पाळले जातात. यामध्ये बरेच व्यक्ती चपाती खायचे देखील सोडतात.

आपण भारतीय आहाराचा विचार केला तर पोळी भाजी म्हणजेच चपाती आणि भाजी हा आपला मुख्य आहार आहे. चपातीचा आहारामध्ये मोठ्या प्रमाणावर वापर आपल्याकडे केला जातो. त्यामुळे चपाती सोडण्याची काहीही गरज नाही.

कारण चपाती मध्ये ग्लुटेन नावाचा घटक असतो व त्यामुळे चपाती खाणे बरेच जण बंद करतात. परंतु चपाती खाणे बंद करण्यापेक्षा चपातीच्या पिठामध्ये जर काही बदल केला तर नक्कीच त्याचे पोषणमूल्य तर वाढतेच परंतु वजन नियंत्रणात ठेवण्यास देखील मदत होते. त्याबद्दलचीच माहिती या लेखात घेऊ.

 चपातीत या घटकाचा वापर केला तर वजन कमी करण्यासाठी होईल मदत

चपाती हा आपल्या आहारातील एक महत्त्वाचा पदार्थ असून वजन कमी करणाऱ्या व्यक्तींनी चपाती खाणे बंद करण्याची काहीच गरज नाही. या ऐवजी जर तुम्ही चपातीच्या पिठामध्ये काही महत्त्वाचे बदल केले तर पिठाचे पोषणमूल्य तर वाढतेच परंतु जे व्यक्ती वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांचे वजन नियंत्रणात राहण्यासाठी देखील मदत या माध्यमातून होऊ शकते.

त्यामुळे वजन कमी करण्याकरिता चपाती कशी बनवायची हे देखील तुम्हाला माहित असणे तितकेच गरजेचे आहे. तुम्हाला वजन कमी करण्यासाठी आवश्यक चपाती बनवायची असेल तर डिटॉक्स चपाती कणिक आणि भाज्यांचे एकत्रीकरण यामध्ये येते.

म्हणजेच तुम्ही डिटॉक्स चपाती जेव्हा आहारामध्ये  घेता तेव्हा अर्धी चपाती खाल्ली तरी देखील तुम्हाला शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे ही चपाती चवीला देखील चांगली लागते. यामध्ये फायबर असल्यामुळे ती पचायला देखील खूप हलकी असते.

 अशा पद्धतीने बनवा वजन कमी करण्यासाठी उपयुक्त डिटॉक्स चपाती

या पद्धतीची चपाती बनवण्याकरिता चपातीच्या पिठामध्ये म्हणजे कणीक मध्ये तुम्हाला दुधीची भाजी मिसळणे गरजेचे आहे. चपातीचे पीठ आणि दुधी योग्य प्रमाणामध्ये मिसळून घ्यावे व त्यानंतर हे साहित्य व्यवस्थित एकजीव करून तर पीठ मळावे.

त्यानंतर यात कणकेच्या पोळ्या लाटून घ्याव्यात. यामध्ये मॉइश्चर असल्याने दुधी शरीराला हायड्रेट ठेवते. दुधीची चपाती तयार करण्याकरिता एक कप बारीक केलेली दुधी पीठात वापरा. यामुळे तुमचे शरीर हायड्रेट राहते व दुधीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते.

दुधीमध्ये तुम्हाला पाणी घालण्याची गरज देखील नसते. विशेष म्हणजे यात कॅलरीज आणि फॅट्स जास्त प्रमाणात नसतात व त्यामुळेच वजन कमी करण्यास देखील मदत होते. तसेच दुसरे म्हणजे मल्टीग्रेन चपाती हा देखील यासाठी उत्तम पर्याय आहे.

म्हणजेच तुम्ही जेव्हा गव्हाचे पीठ दळतात तेव्हा त्यामध्ये जर इतर धान्य, कडधान्यांचा समावेश केला तर त्या पिठाचे पोषणमूल्य वाढते व अशा पिठापासून तयार केलेली चपाती शरीरासाठी उपयुक्त ठरते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe