उत्तम आरोग्याकरिता गाईचे दूध चांगले आहे की म्हशीचे? वाचा आरोग्याच्या दृष्टिकोनातून दुधाचे फायदे

Ajay Patil
Published:
health benifit of milk

दुधाला पूर्णांन्न असे म्हटले जाते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून दूध हे अतिशय फायदेशीर असून  दुधातील घटक हे शरीराच्या उत्तम आरोग्याकरिता खूप महत्त्वाचे आहेत. साधारणपणे आपण विचार केला तर आपल्याकडे प्रामुख्याने आहारात गाईच्या आणि म्हशीच्या दुधाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु आपल्याला माहित आहे का की आरोग्याच्या दृष्टिकोनातून दोघांपैकी कोणते दूध आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे.

तसे पाहिला गेले तर गाईचे दूध सुद्धा तितक्याच प्रमाणामध्ये फायदेशीर आहे. परंतु काही गोष्टींनी गायीच्या आणि म्हशीच्या दुधामध्ये काही फरक असल्यामुळे दोन्ही दुधात काहीसा फरक पडतो. याचा अनुषंगाने आपण या लेखांमध्ये गाय आणि म्हशीच्या दुधामध्ये नेमका काय फरक असतो? त्याची थोडक्यात माहिती घेणार आहोत.

 गाय म्हशीच्या दुधातील फरक

1- पचनाच्या दृष्टिकोनातून जर आपण पचनाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर गाईचे दूध हे म्हशीच्या दुधाच्या तुलनेत पचायला खूप हलके असते. तसेच ते कमी चरबीयुक्त असते म्हशीच्या दुधाच्या तुलनेत खूप ताबडतोब पचते. त्यामुळे आपल्याकडे लहान मुलांना प्यायला गाईचेच दूध प्रामुख्याने दिले जाते.

म्हशीच्या दुधाचा विचार केला तर यामध्ये मलईचे प्रमाण जास्त असते व ते जाड असते म्हणून त्याचा उपयोग प्रामुख्याने खीर तसेच कुल्फी, दही, चीज आणि तूप तयार करण्याकरिता होतो. परंतु गाईच्या दुधाचा वापर हा प्रामुख्याने रसमलाई आणि रसगुल्ला तयार करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर होतो.

2- साठवण्याच्या कालावधीच्या दृष्टिकोनातून जर दुधाची साठवण या अंगाने विचार केला तर गाईचे दूध एक ते दोन दिवसातच तुम्हाला सेवन करणे महत्त्वाचे असते. परंतु म्हशीचे दूध तुम्हाला बरेच दिवस स्टोअर करता येऊ शकते.

3- पोषक घटकांच्या दृष्टिकोनातून जर दुधातील पोषक घटक डोळ्यासमोर ठेवून विचार केला तर म्हशीच्या दुधामध्ये गाईच्या दुधाच्या तुलनेत प्रथिनांचे प्रमाण जास्त असते व चरबीचे प्रमाण देखील जास्त असते. त्यामुळे म्हशीच्या दुधात कॅलरीज जास्त असतात. परंतु गाईच्या दुधाचा विचार केला तर यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते व या दुधाचे घनतेचे प्रमाण देखील कमी असते. गाईचे 90% दूध हे पाण्यापासून बनलेले असते.

4- चरबीचे प्रमाण गाईच्या दुधामध्ये म्हशीच्या दुधापेक्षा चरबीचे प्रमाण तुलनेने कमी असते. त्यामुळे गायीच्या दुधापेक्षा म्हशीचे दूध हे अधिक जाड असते. गाईच्या दुधामध्ये साधारणपणे तीन ते चार टक्क्यांपर्यंत चरबी असते तर म्हशीच्या दुधामध्ये हे प्रमाण सात ते आठ टक्क्यांपर्यंत असते.

5- प्रथिनांचे प्रमाण शरीराला आवश्यक असणाऱ्या प्रथिनांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर म्हशीच्या दुधामध्ये गायीच्या दुधापेक्षा दहा ते अकरा टक्के प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. याच कारणामुळे लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती यांना म्हशीचे दूध प्यायला दिले जात नाही.

6- कॅलरीजचे प्रमाण जर आपण कॅलरीज च्या प्रमाणाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर म्हशीच्या दुधामध्ये कॅलरीज जास्त असतात व त्या तुलनेत गायीच्या दुधात कमी असतात. एक कप म्हशीच्या दुधामध्ये साधारणपणे २३७ कॅलरीज असतात व गाईच्या एक कप दुधात 148 कॅलरीज असतात.

7- कोलेस्टेरॉलचे प्रमाण म्हशीच्या दुधामध्ये गायीच्या दुधाच्या तुलनेत कोलेस्ट्रॉल कमी असते म्हणून ते उच्च रक्तदाब व किडनी विकाराची समस्या आणि लठ्ठपणामुळे त्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी चांगले असल्याचे सिद्ध झाले आहे.

अशा पद्धतीने गाय व म्हशीच्या दुधाचा विचार केला तर या दृष्टिकोनातून आपल्याला फरक दिसून येतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe