Health Tips: हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते ‘झिरो ऑइल कूकिंग’! काय असता त्याचे फायदे? वाचा माहिती

Ajay Patil
Published:
zero oil cooking

Health Tips-: सध्या दैनंदिन जीवन अतिशय धकाधकीचे झाले असल्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयी पासून तर अगदी झोपण्याच्या सवयीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाल्याने आरोग्याच्या अनेक समस्या सध्या निर्माण झाल्याची सध्या स्थिती आहे.

त्यामुळे मधुमेह, हृदयविकाराच्या समस्या तसेच हाय ब्लड प्रेशर, वजन वाढणे यासारखे अनेक समस्या निर्माण झाले आहेत. तसेच जर आपण या परिस्थितीमध्ये जर आहाराचा विचार केला तर जास्त करून फास्ट फूड खाण्याकडे कल दिसून येत असल्यामुळे देखील आरोग्याविषयी अनेक समस्या निर्माण झाले आहेत.

तसेच आहारामध्ये जास्त प्रमाणात तेलाचा वापर केला गेल्यामुळे देखील अनेक समस्या निर्माण झाले आहेत. यामध्ये जर आपण हृदयाशी संबंधित जर विचार केला तर त्याचा थेट संबंध हा आहाराशी येत असल्याने आहाराशी संबंधित गोष्टींवर खूप काळजी घेणे गरजेचे असते.

आजकाल मोठ्या प्रमाणावर तेलाचा वापर आहारामध्ये केला जातो व हेच कारण हृदयविकारासाठी कारणीभूत ठरताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे आहारामध्ये जास्त तेलाचा वापर टाळणे खूप गरजेचे आहे.

याकरिता झिरो ऑइल कुकिंगचा पर्याय निवडला तर खूप फायदा होताना दिसून येऊ शकतो. त्यामुळे या लेखात आपण नेमके झिरो ऑइल कुकिंग काय असते व त्याचे फायदे कसे मिळतात? याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.

 झिरो ऑइल कुकिंग म्हणजे नेमके काय?

 झिरो ऑइल कुकिंगचा जर अर्थ आपण पाहिला तर अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून स्वयंपाक करणे किंवा अन्न शिजवणे हा होय. कारण शरीरातील जे काही अतिरिक्त तेल असते ते फॅटी लिव्हर, कोलेस्ट्रॉल तसेच डायबिटीज व कर्करोगासारख्या समस्यांना कारणीभूत ठरते.

त्यामुळे आहारात जास्त तेलाचा वापर न करता दिवसाला 15 ग्रॅम म्हणजेच तीन चमचे तेलाचा वापर करणे निरोगी शरीरासाठी फायद्याचे ठरते. त्यामुळे जे हृदयरोगाचे रुग्ण आहेत किंवा हृदयाच्या समस्या ज्या लोकांना आहेत त्यांनी झिरो ऑइल कुकिंगचा पर्याय निवडणे गरजेचे आहे.

 झिरो ऑइल कुकिंगचे आरोग्याला कोणते होतात फायदे?

1- कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी- हृदयाच्या आरोग्य आणि कोलेस्ट्रॉलची पातळी यांचा घनिष्ठ संबंध असल्याने हृदयाचे आरोग्य जर चांगले ठेवायचे असेल तर कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणे हे महत्त्वाचे असते.

त्यामुळे जर झिरो ऑइल कुकिंगचा वापर केला तर कॅलरीजचे प्रमाण कमी होत नाही तर शरीरातील कोलेस्ट्रॉलचे पातळी देखील कमी व्हायला मदत होते. तसेच कमी तेला मध्ये जर अन्न शिजवले तर अशा अन्नाच्या सेवनाने हृदयाच्या आरोग्य देखील सुधारते.

2- हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचे- झिरो ऑइल कुकिंगची निवड केल्याने शरीरातील चरबी कमी होते व छातीत दुखणे तसेच हृदयविकाराचा झटका येणे किंवा पॅरालीसीस त्यातील समस्या येऊ शकत नाहीत. कारण जर आहारामध्ये जास्त तेलाचा वापर केला तर शरीरात ट्रायग्लिसरॉईडची पातळीत वाढ होते व चरबी वाढते.

चरबी वाढल्याने साहजिकच हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता असते. झिरो ऑइल कुकिंगच्या वापराने शरीरातील ट्रान्सफॅटचे प्रमाण कमी होते व हृदयाशी संबंधित समस्या आपोआप दूर होण्यास मदत होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe