Horoscope:- भारतीय वैदीक ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर ग्रहताऱ्यांच्या वेगवेगळ्या स्थितीचा खूप मोठा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम प्रत्येक राशीवर होत असतो. यामध्ये वेगवेगळ्या ग्रहांचे गोचर तसेच चाल इत्यादी घटनांचा परिणाम राशी व त्या अनुषंगाने व्यक्तीच्या जीवनावर होत असतो.
त्यामुळे ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहताऱ्यांच्या हालचाली आणि त्यांचा पडणारा व्यक्तीच्या आयुष्यावरचा परिणाम याचा अभ्यास केला जातो. याचप्रमाणे जर आपण बघितले तर शनि देवाला न्यायाची देवता म्हणून ओळखले जाते व शनिच्या अनेक स्थितीचा परिणाम हा प्रत्येक राशीवर दिसून येतो.
कर्माचे फळ देणारी देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शनी जूनमध्ये वक्री झाला होता व तो आता दिवाळीनंतर सरळ चाल चालणार आहे. त्यामुळे या स्थितीचा खूप चांगला परिणाम काही राशीवर होणार आहे. जेव्हा शनीची सरळ चाल सुरू होईल तेव्हा काय राशींवर शनि देवाचा विशेष आशीर्वाद पाहायला मिळणार आहे या कालावधीत या राशींना धनलाभ देखील होणार आहे.
शनीच्या सरळ चालीचा या राशींना होईल फायदा
1- मिथुन राशी– दिवाळीनंतर शनि जेव्हा सरळ चालेल तेव्हा त्याचा फायदा मिथुन राशींच्या व्यक्तींना खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे. कालावधीत या राशीच्या लोकांना नशिबाची देखील भरपूर साथ मिळणार आहे व जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये या राशीच्या व्यक्तींना खूप मोठे यश मिळण्यास मदत होणार आहे.
इतकेच नाहीतर अचानकपणे काही आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील आहे. तसेच कुटुंबातील इतर सदस्यांशी तुमचे संबंध या कालावधीत खूप चांगले राहतील. तुम्ही या कालावधीत एखादी मालमत्ता किंवा वाहन देखील खरेदी करू शकतात.
विद्यार्थी वर्गाला कुठल्याही परीक्षेमध्ये चांगले यश मिळू शकते. तसेच या कालावधीत धार्मिक व शुभ कार्यक्रमात सहभाग नोंदवू शकतात.
2- मकर राशी– शनि देवाची सरळ चाल मकर राशीच्या व्यक्तींसाठी देखील लाभदायक ठरणार आहे.तसेच शनिदेव हा मकर राशीचा स्वामी ग्रह आहे. मकर राशीच्या व्यक्तींच्या कुंडलीतील धन घरावर शनी देव थेट आगमन करणार आहेत व यावेळी जर मकर राशींच्या व्यक्तीने सामाजिक आणि धार्मिक कार्य केले तर समाजात मानसन्मान वाढण्यास मदत होणार आहे.
जर मकर राशींच्या व्यक्तींना पैशाच्या संबंधित काही समस्या असतील तर त्या देखील दूर होतील व या राशीच्या व्यावसायिकांचे पैसे अडकलेले असतील तर ते देखील मिळू शकणार आहेत. या कालावधीनंतर मकर राशींच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होणार आहे.
3- वृश्चिक राशी– या राशीच्या लोकांसाठी शनि देवाची सरळ चाल खूप फायद्याची ठरणार आहे. या कालावधीत या राशींच्या लोकांच्या सुख सुविधेमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे आणि कुटुंबातील सदस्यांचे संबंध देखील चांगले राहणार आहेत. जे लोक नोकरदार आहेत अशा लोकांना कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या कालावधीत मिळणार आहेत.
तसेच व्यवसायिकांना चांगला नफा या व्यवसायाच्या माध्यमातून मिळू शकतो. एकंदरीत पाहिले तर या कालावधीत वृश्चिक राशींच्या व्यक्तींच्या करियर आणि व्यवसायामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती होण्याची शक्यता आहे.