Astrology Tips: आंघोळ करा परंतु पाण्यामध्ये ‘या’ गोष्टी मिसळा! उजळेल तुमचे भाग्य व मिळेल यश, वाचा काय म्हणते ज्योतिष शास्त्र?

Published on -

Astrology Tips :- भारतीय परंपरांचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये अनेक अध्यात्मिक आणि धार्मिक गोष्टींना आज देखील खूप मोठ्या प्रमाणावर महत्त्व दिले जाते. आज देखील भारतातील बहुसंख्य लोक खूप श्रद्धाळू आणि रूढी परंपरा जपणारे असून मोठ्या प्रमाणावर धार्मिक श्रद्धा देखील पाळण्यात येतात. तसेच जे काही विविध प्रकारची शास्त्र आहेत त्यामध्ये ज्योतिषशास्त्राला खूप मोठे महत्त्व आहे.

कारण आपल्या जीवनातील अनेक छोट्या-मोठ्या घटना किंवा दैनंदिन गोष्टी याचा थेट संबंध हा ज्योतिष शास्त्राशी जोडला जातो.  कारण ग्रह किंवा इतर गोष्टींचा व्यक्तींच्या जीवनावर पडणारा प्रभाव याचा सगळा अभ्यास हा ज्योतिष शास्त्रामध्ये केला जातो.

त्यामुळे ज्योतिष शास्त्र हे व्यक्तीच्या सुखी आयुष्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असे शास्त्र मानले जाते. ज्योतिष शास्त्रातील तत्त्वांचा जर जीवनामध्ये वापर केला तर चांगले आरोग्य तसेच संपत्ती व नातेसंबंध सुधारतात व करिअर साठी देखील उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात असे आज देखील मानले जाते.

ज्योतिष शास्त्रानुसार जर काही गोष्टींचे पालन आपण आयुष्यामध्ये केले तर नक्कीच यश,पैसा व प्रसिद्धी देखील मिळते. ज्योतिष शास्त्रानुसार जर दैनंदिन आयुष्यामध्ये जर काही गोष्टींचा अवलंब केला तर व्यक्तीला यश तसेच पैसा मिळण्यास मदत होते.

याच पद्धतीने जर आपण ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर दररोज आंघोळ करताना पाण्यामध्ये तर तुम्ही काही गोष्टी टाकल्या तर नक्कीच ते भाग्य उजळण्यासाठी फायद्याच्या ठरतात. त्यामुळे आंघोळ करताना पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकाव्यात? याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.

 आंघोळ करताना पाण्यात या गोष्टी टाका

1- पाण्यात मीठ टाकणे आठवड्यातून दोन दिवस आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकणे खूप फायद्याचे ठरू शकते. मिठाच्या पाण्याने अंघोळ करण्यासाठी मंगळवार आणि शनिवार अतिशय शुभ दिवस आहे. असं केल्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर व्हायला मदत होते.

2- दूध आंघोळ करताना जर आठवड्याच्या सोमवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकले तर मानसिक शांती मिळते.

3- हळद गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकल्याने गुरु ग्रह मजबूत होतो असे सांगितले जाते. असं केल्यामुळे तुमच्या त्वचेवर तेज येते व हळदीच्या पाण्याने स्नान केल्यामुळे संपत्ती देखील वाढते.

4- परफ्युम शुक्रवारीचा रांगोळीच्या पाण्यामध्ये एखादे सुगंधी द्रव्य टाकून आंघोळ केली तर आमच्याकडे आकर्षण वाढण्यास मदत होते. हा उपाय शुक्रवारी केला तर नक्कीच याचा फायदा होतो.

5- गुलाबजल शुक्रवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबजल टाकले तर शरीर मजबूत होते तसेच गुलाब पाण्याने अंघोळ केल्याने जीवनातील सर्व सुखसोयी आणि सुख सुविधा मिळतात.

त्यामुळे आंघोळीच्या पाण्यात काही गोष्टी टाकून आंघोळ केली तर चमत्कारिक फायदे मिळून जीवनात समृद्धी मिळू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News