Shadashtak Rajyog:- ज्योतिष शास्त्रामध्ये बघितले तर न्याय आणि दंडाची देवता शनि आणि ग्रहांचा सेनापती म्हणून मंगळ या ग्रहांना ओळखले जाते. या दोन्ही ग्रहांचा प्रत्येक राशीवर अनेक प्रकारे चांगला किंवा वाईट असा परिणाम होत असतो. या दोन्ही ग्रहांच्या राशी बदलाचा कालावधी पाहिला तर मंगळाची राशी अल्पावधीमध्ये बदलते.
तर त्याउलट शनी ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याकरिता अडीच वर्षांचा कालावधी लागतो. ज्योतिषशास्त्रानुसार बघितले तर शनी सध्या त्याच्या मूळ त्रिकोणी राशी अर्थात कुंभ राशीमध्ये स्थित आहे व मंगळ हा कर्क राशिमध्ये स्थित असून 29 मार्च 2025 पर्यंत शनी कुंभ राशीमध्ये असणार आहे.
तर मंगळ सात डिसेंबरला कर्क राशीत मागे जाईल आणि 21 जानेवारी 2025 पर्यंत त्याच राशीत राहणार आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रहांच्या या परिस्थितीमुळे सहाव्या आणि आठव्या घरात दोन्ही ग्रह असणार आहेत. त्यामुळे या दोन्ही ग्रहांपासून षडाष्टक योग तयार झालेला आहे. या योगामुळे काही राशींना खूप मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
षडाष्टक राजयोगामुळे या तीन राशींचे चमकेल नशीब
1- कुंभ राशी- शनि आणि मंगळाच्या संयोगाने तयार झालेला षडाष्टक योगामुळे कुंभ राशीच्या लोकांना खूप मोठा फायदा होणार आहे. या व्यक्तींच्या आत्मविश्वासाने धैर्यात वाढ होईल तसेच प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करू शकणार आहेत. इतकेच नाहीतर दीर्घ काळापासून प्रलंबित आणि रखडलेली कामे देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे.
तसेच या राशीचे जे व्यक्ती व्यवसायामध्ये असतील ते काही मोठे निर्णय घेऊ शकतात व नोकरीच्या अनेक नवीन संधी देखील उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आरोग्य ठणठणीत राहील व करिअर बदलाच्या नवीन संधी आणि गुंतवणुकीचे मोठे निर्णय देखील घेता येतील.
2- मेष राशी- शनि आणि मंगळाच्या संयोगाने तयार झालेला षडाष्टक योग मेष राशींच्या लोकांसाठी अनुकूल ठरेल. प्रत्येक क्षेत्रामध्ये या व्यक्तींना यश मिळू शकते तसेच कुटुंबामध्ये सुख-समृद्धी असेल.
नोकरीच्या ठिकाणी पगार वाढण्याची किंवा प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. तसेच व्यवसायामध्ये नवीन योजना बनवू शकतात. जीवनात सगळा आनंदी आनंद राहील व वैवाहिक जीवन चांगले राहील.
3- तूळ राशी- षडाष्टक योग तूळ राशीच्या व्यक्तीकरिता खूप भाग्याचा सिद्ध होणार आहे. या कालावधीत या व्यक्तींना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. आर्थिक स्थिती मजबूत होईल व तुम्हाला मित्र आणि कुटुंबियांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
तुम्हाला मंगळ आणि शनीचा अपार आशीर्वाद या कालावधीत मिळतील. दीर्घकाळ प्रलंबित आणि रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतील. आर्थिक स्थिती चांगली राहील व कुटुंबात सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येतील.