Horoscope:- अनेक ग्रह हे ठराविक कालावधीनंतर गोचर तसेच अस्त करत असतात व याचा प्रभाव प्रत्येक राशींवर दिसून येतो. ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे शुभ आणि अशुभ योग तयार होतात व त्याचा देखील परिणाम संपूर्ण मानव जातीवर दिसून येतो.
अशीच काहीशी परिस्थिती 11 फेब्रुवारीपासून म्हणजेच कालपासून दिसून आली असून 11 फेब्रुवारीला शनि देवाचा संध्याकाळी साधारणपणे सात वाजेच्या दरम्यान कुंभ राशीत अस्त होणार आहे व 18 मार्चपर्यंत शनि महाराज याच स्थितीत असणार आहेत.
त्यामुळे सूर्याचा प्रभाव वाढणार आहे व शनीची शक्ती कमी व सूर्याचा प्रभाव अधिक अशी अवस्था निर्माण होणार आहे. त्यामुळे हा कालावधी काही राशींसाठी अत्यंत शुभ आणि मोठे फळ देणारा ठरणार आहे. नेमक्या या भाग्यवान राशी कोणत्या आहेत? याबाबतची माहिती बघू.
शनि महाराजांच्या कृपेने या राशींचे पालटेल भाग्य
1- तूळ- शनि महाराजांचा अस्त हा तूळ राशीसाठी खूप फलदायी ठरणार असून या राशींच्या व्यक्तींसाठी हा कालावधी आनंदाने आणि सुखाने भरलेला असणार आहे. साधारणपणे 18 मार्चपर्यंत तूळ राशींच्या व्यक्तींच्या अनेक मोठ्या इच्छा पूर्ण होतील व अनेक कामे मार्गी लागणार आहेत.
तसेच या कालावधीत प्रॉपर्टी व वाहन खरेदीचा देखील योग आहे. वाडवडिलांच्या संपत्तीचा फायदा मिळण्याची शक्यता आहे तसेच समाजातील स्थान देखील बळकट होणार आहे.
कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या मदतीने आपण एखाद्या मोठे काम पूर्ण करू शकणार आहात व यातून तुम्हाला प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे.
2- मेष- शनि महाराजांच्या अस्त झाल्यामुळे मेष राशींच्या व्यक्तींना करिअरमध्ये खूप फायदा होणार आहे. प्रत्येक वर्षापासून जे कष्ट घेत आहात त्याचे फळ आता मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या नवीन संधी चालून येऊ शकतात तसेच समाजामध्ये मानसन्मान वाढणार आहे.
समाजात प्रतिष्ठा वाढल्यामुळे नवीन जबाबदाऱ्या देखील स्वीकारावा लागणार आहेत. मेष राशींचे जे व्यक्ती व्यावसायिक असतील त्यांच्याशी काही नवीन लोक जोडली जातील व त्यामुळे खूप मोठा फायदा होऊ शकतो.
3- मिथुन- मिथुन राशींच्या व्यक्तींना देखील शनि महाराजांच्या अस्ताचा फायदा होणार असून धनलाभ व मान सन्मानाच्या अनेक संधी मिळणार आहेत. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होणार असून त्यातून प्रचंड फायद होण्याची शक्यता आहे.
धनलाभ होण्याची शक्यता असून वैवाहिक आयुष्यामध्ये देखील सुधारणा होणार आहे. पती-पत्नीच्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण होऊ शकतो. मिथुन राशींच्या व्यक्तींनी या कालावधीमध्ये मेहनतीला कुठलाही पर्याय शोधू नये.
विवाह करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींना चांगले स्थळ सांगून येण्याची शक्यता आहे. आयुष्यामध्ये नव्या व्यक्तींची किंवा वस्तूंची जोड लाभू शकते व याच माध्यमातून काही बदल देखील घडून येण्याची शक्यता आहे.
( टीप– वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही माध्यम मधून काम करत आहोत. याविषयी आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा करीत नाहीत.)