एप्रिल ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत गुरुच्या ‘या’ स्थितीमुळे 3 राशींना मिळेल भरपूर पैसा! वाचा कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी

Ajay Patil
Published:
jupiter horoscope

 प्रत्येक ग्रह त्याच्या काही ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करत असतात. ग्रह एका राशीतुन दुसऱ्या राशीत जात असतात. ग्रहांच्या या राशी परिवर्तनाचा फायदा काही राशींना होतो तर काही राशींना नुकसान देखील होते. तसेच यामुळे काही शुभ राजयोग देखील तयार होतात.

ज्योतिष शास्त्रानुसार पाहिले तर ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा मोठा फायदा बऱ्याच राशींना होत असतो. याच प्रमाणे जर आपण गुरुग्रहाचा विचार केला तर सध्या गुरु हा ग्रह शतभिषा नक्षत्रामध्ये आहे. एवढेच नाही तर सहा एप्रिलला दुपारी तीन वाजून 55 मिनिटांनी गुरु ग्रह पूर्वाभाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करणार

असून जवळजवळ या नक्षत्रामध्ये 3 ऑक्टोबर 2024 पर्यंत राहणार आहे. त्यामुळे गुरुच्या या पूर्वी भाद्रपद नक्षत्रामध्ये जाण्याने काही राशींचे नशीब उजळणार आहे. त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत? हे आपण या लेखात बघणार आहोत.

 गुरुच्या नक्षत्र परिवर्तनामुळे या राशींना मिळेल पैसा?

1- सिंह राशी- या राशीच्या नवव्या म्हणजेच भाग्याच्या घरात गुरू ग्रह विराजमान होणार असल्यामुळे या राशीच्या लोकांचे बऱ्याच काळापासून अडकलेली कामे पूर्ण होऊ शकणार आहेत. तसेच सिंह राशींच्या व्यक्तींनी केलेल्या मेहनतीचे फळ त्यांना मिळणार आहे.

तसेच परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळवण्याची संधी मिळणार आहे. तसेच सिंह राशींच्या व्यक्तींची आध्यात्मिक दिशेने आवड वाढेल व त्यानुसार वडीलधाऱ्या मंडळीचा व गुरूंचा सहयोग मिळणार आहे. समाजामध्ये मिळणाऱ्या मानसन्मानामध्ये वाढ होणार आहे.

2- कर्क राशि- गुरुचे गोचर या राशीच्या दशम भावात होणार आहे. त्यामुळे कर्क राशींच्या व्यक्तींच्या करिअरमध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत त्या संपण्यास मदत होणार आहे. तसेच सरकारी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळणार असून मान सन्मान देखील मिळणार आहे.

बऱ्याच दिवसापासून रखडलेली कामे पूर्ण होण्यास मदत होणार आहे व उत्पन्नाचे नवीन स्त्रोत देखील मिळणार आहे. या कालावधीत पैशांची बचत करण्यात कर्क राशींची व्यक्ती यशस्वी होऊ शकतात. पैशाच्या घरात शनीच्या सप्तम भावामुळे कर्क राशींच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे.

तसेच या राशींच्या व्यक्तींना मुलांकडून देखील आनंदाची बातमी मिळू शकणार आहे. शेअर्स मार्केट किंवा लॉटरी  मधून चांगला पैसा मिळू शकणार आहे. शेअर बाजारात गुंतवणूक केली असेल तर मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. जे व्यक्ती अविवाहित असतील त्यांना लग्नाचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.

3- मिथुन राशी- गुरुचे पूर्वाभाद्रपद नक्षत्रात येण्यामुळे मिथुन राशींच्या व्यक्तींना खूप मोठा फायदा होणार आहे. या कालावधीत या व्यक्तींना नशिबाची पूर्ण साथ मिळणार असून उत्पन्नाचे नवीन स्त्रोत लाभणार आहेत  त्यामुळे भरपूर पैसे कमावण्यामध्ये हे व्यक्ती यशस्वी होऊ शकणार आहे.

जे व्यक्ती राजकारणामध्ये असतील त्यांना मोठ्या अधिकाऱ्यांशी संबंध प्रस्थापित करणे शक्य होणार असून त्यामुळे या व्यक्तींची निर्णय घेण्याची क्षमतेत वाढ होणार आहे व भविष्यामध्ये या स्थितीचा खूप मोठा फायदा होणार  आहे.

नोकरी करणाऱ्या व्यक्तींना खूप मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला काही नवीन काम सुरू करायचे असेल तर तुम्ही या कालावधीत सुरू केले तर त्याचा फायदा मिळू शकणार आहे.

( टीप वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यम म्हणून आम्ही काम करत आहोत. याविषयी कुठल्याही प्रकारचा दावा आम्ही करत नाहीत.)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe