Horoscope January 2025:- नवीन वर्षामध्ये जर आपण बघितले तर अनेक ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहे व या राशी परिवर्तनामुळे बारा राशींवर चांगला किंवा वाईट परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे. इतकेच नाही तर या राशी परिवर्तनामुळे काही राजयोग देखील तयार होणार असून याचा देखील चांगला किंवा वाईट परिणाम राशींवर पाहायला मिळणार आहे.
अगदी याच पद्धतीने ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे व या दिवशी सूर्य हा कुंभ राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार असून या दिवसापासून शुभ कार्याला सुरुवात होते असे म्हटले जाते.
सूर्यदेव हे मकर संक्रांतीच्या दिवशी उत्तरायण होतात व ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार जर बघितले तर यावर्षीचे मकर संक्रांति ही खूप विशेष आहे. कारण या दिवशी सूर्यदेव मकर राशि मध्ये प्रवेश करणार असून याच दिवशी पुष्य नक्षत्राचा देखील योगायोग होत आहे व ही परिस्थिती काही राशींसाठी मात्र खूप फायद्याची ठरणार आहे.
मकर संक्रांती पासून या राशींचे सुरू होणारा अच्छे दिन
1- सिंह राशी- या राशींच्या व्यक्तींसाठी येणारी मकर संक्रांत खूप खास असणार आहे. सूर्य देवाच्या कृपेमुळे या व्यक्तींचा मान सन्मान वाढीस लागेल व जे व्यक्ती नोकरीला असतील त्यांना प्रमोशन मिळू शकते.
वैवाहिक जीवनामध्ये सुख शांतता राहील व ते एकंदरीत आनंदाचे राहील. व्यवसायामध्ये आर्थिक सुधारणा पाहायला मिळतील व गुंतवणुकीतून चांगला फायदा होण्याची शक्यता आहे व पैसा येत राहील व त्यामुळे मानसिक स्थिती देखील चांगली राहील.
2- मकर राशी- मकर राशीसाठी देखील मकर संक्रात खूप शुभ असे असते. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करेल तेव्हा शुभ आणि चांगले दिवसांची सुरुवात होणार आहे.
या काळामध्ये कामात चांगले यश मिळेल व आरोग्य देखील ठणठणीत राहील. कोणत्याही नवीन कामाला सुरुवात करायची तर या कालावधीत करू शकतात.
3- तूळ राशी- या राशींच्या व्यक्तींना देखील मकर संक्रांतीचा खूप मोठा फायदा होण्याची शक्यता असून जमिनीच्या बाबतीत आर्थिक प्रगती होईल तसेच कुटुंबामध्ये सुख शांतता लाभेल. एवढेच नाही तर जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
आवश्यक कामासाठी कुटुंबातील वडील किंवा मोठ्या भावाकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. जे नोकरी करतात त्यांना नवीन आणि चांगल्या ऑफर मिळू शकतात. व्यवसायामध्ये असलेल्यांसाठी हा कालावधी चांगला असून आर्थिक स्थिती सुधारेल. आरोग्य चांगले राहील.
4- मेष राशी- या राशींच्या व्यक्तींना करिअरमध्ये खूप मोठा फायदा होईल. जे व्यक्ती नोकरदार असतील त्यांना नवनवीन संधी प्राप्त होतील. आर्थिक स्थितीमध्ये देखील सकारात्मक असे बदल पाहायला मिळतील.
व्यवसायात असणाऱ्या व्यक्तींसाठी हा कालावधी चांगला आहे. व्यवसायामध्ये आर्थिक स्थिती चांगली राहील व सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबातील सर्व सदस्यांचे सहकार्य मिळेल.
5- कुंभ राशी- कुंभ राशींच्या व्यक्तींकरिता हा कालावधी खूप अनुकूल असणार आहे. आर्थिक प्रगतीच्या बाबतीत अनेक शक्यता निर्माण होतील व नवीन प्रकल्पांमध्ये यश मिळेल.
तसेच व्यावसायिक लोकांसाठी त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांची आर्थिक स्थिती अगोदर पेक्षा खूप उत्तम राहील. धार्मिक कार्यामध्ये चांगला उत्साह दिसून येईल.