Horoscope:- ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहताऱ्यांचा व्यक्तीच्या राशीनुसार पडणारा प्रभाव याचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो. ग्रहांचे जे काही एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये परिवर्तन किंवा गोचर होते याचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम हा त्या-त्या राशींच्या व्यक्तींवर होत असतो.
त्यामुळे ग्रहताऱ्यांची स्थितीच्या दृष्टिकोनातून ज्योतिष शास्त्रामध्ये खूप महत्त्व असते. त्यासोबतच ग्रहांचा जेव्हा अस्त होतो तेव्हा त्याचा देखील बराचसा परिणाम हा व्यक्तीच्या जीवनावर दिसून येतो. याच मुद्द्याला धरून जर आपण बुध ग्रहाचा विचार केला तर बुध ग्रहाला ग्रहांचा सेनापती म्हणतात व वाणी तसेच बुद्धीचा कारक ग्रह म्हणून देखील बुध ग्रहाला ओळखले जाते.
त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या जन्म कुंडलिमध्ये शुभ स्थितीमध्ये जर बुध ग्रह असेल तर खूप चांगले परिणाम पाहायला मिळतात. ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर बुध ग्रह सिंह राशीमध्ये असून 4 ऑगस्टला तो अस्त होणार आहे. बुध ग्रहाच्या या स्थितीचा परिणाम हा काही राशींच्या व्यक्तीच्या जीवनावर होणार असून त्याचे अनेक शुभ परिणाम बघायला मिळणार आहे.
बुध ग्रहाच्या अस्तामुळे या राशींच्या व्यक्तींना होईल संपत्तीचा लाभ?
1- कर्क राशी– बुध ग्रह सिंह राशीमध्ये अस्त होत असल्यामुळे त्याचा शुभ परिणाम हा कर्क राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळणार आहे. या कालावधीमध्ये जर कर्क राशींच्या व्यक्तींनी गुंतवणूक केली तर त्याच्यापासून खूप मोठा फायदा मिळेल. या व्यक्तींचे आरोग्य देखील उत्तम राहून कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
जुनी महत्त्वाची कामे अडकलेली असतील तर ती देखील पूर्ण होतील व जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना देखील या कालावधीत फायदा होईल.
पैशांची बचत करणे कर्क राशींच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर ठरेलच.परंतु या कालावधीत उत्पन्नाचे नवे मार्ग देखील मिळतील.करिअरमध्ये तुम्हाला हवे तसे यश या कालावधीत तुम्हाला बघायला मिळेल व त्यात उत्साह आणि आत्मविश्वास देखील निर्माण होईल.
2- धनु राशी– धनु राशींच्या व्यक्तींकरिता देखील बुध ग्रहाचे अस्त होणे खूप फायद्याचे ठरणार आहे. एखाद्या कामासाठी जर कष्ट घेतले असतील तर त्यामध्ये यश मिळणार असून कुटुंबात देखील सुख आणि शांतीचे वातावरण पाहायला मिळणार आहे.
धनु राशींच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती या कालावधीत उत्तम असणार असून करिअर व व्यवसायामध्ये देखील यश मिळणार आहे. काही दिवसांपासून कुठे अडकलेले पैसे असतील तर ते देखील परत मिळतील.
परंतु धनु राशींच्या व्यक्तींना या कालावधीत खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. जे व्यक्ती नोकरी करतात त्यांच्या कामांमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील व स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्यांसाठी हा एक चांगला काळ असेल.
3- सिंह राशी– बुध ग्रहाचे अस्त होणे हे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी खूप फायदा देणारे ठरणार असून या कालावधीमध्ये या व्यक्तींची अनेक समस्यांपासून मुक्तता होणार आहे.
करिअरमध्ये देखील चांगले यश मिळवता येणे शक्य होणार असून मुलांकडून देखील चांगल्या बातम्या कानी पडतील व आर्थिक परिस्थिती देखील या कालावधीत उत्तम राहील.
सिंह राशींच्या व्यक्तींना या कालावधीत कर्ज फेडण्यास देखील मदत होईल व समाजात मानसन्मान मिळेल. तुमची जर वाहन व मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही या कालावधीत पूर्ण करू शकाल. या कालावधीत थोड्याफार काही अडचणी येऊ शकतात. परंतु त्या तुम्ही दूर करण्यास सक्षम असाल.