Numerology:- कुठल्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये सर्वात मोठा प्रभाव हा त्याच्या कुंडलीमध्ये उपस्थित असलेल्या ग्रहांची स्थिती कशी आहे यावर खूप मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो. ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रह आणि व्यक्तीची राशी पाहून व्यक्तीचे जीवन आणि भविष्य याबद्दलचे आकलन केले जाते.
परंतु या व्यतिरिक्त आपण अंकशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून देखील एखाद्या व्यक्ती बद्दल सर्व काही जाणून घेऊ शकतो. आपल्याला माहित आहे की, एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख व त्या जन्मतारखेवरून मुलांक काढला जातो व त्या मुलांकावरून व्यक्तीच्या जीवनाबद्दलचे सर्व काही माहिती सांगता येते.
अंकशास्त्रामध्ये अनेक संख्या सांगितल्या आहेत व ज्यामध्ये एक ते नऊ पर्यंतचे मूलांक देखील असतात. हे नऊ मुलांक 9 ग्रहांशी संबंधित आहेत व ते जीवनाच्या कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.
त्यामुळे या लेखात आपण कोणत्याही महिन्याच्या दोन, 11, वीस आणि 29 या तारखांना जन्म झालेल्या लोकांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत व त्यांचा मुलांक हा दोन आहे. 2025 हे वर्ष या लोकांसाठी कसे असेल? याबद्दलची माहिती या लेखात बघणार आहोत.
कोणत्याही महिन्याच्या 11,2,20 आणि 29 तारखेला जन्म झालेल्या लोकांसाठी 2025 हे वर्ष कसे राहील?
1- करिअरच्या दृष्टिकोनातून- दोन मुलांक असलेल्या लोकांबद्दल जर आपण पाहिले तर नोकरी, धन तसेच व्यवसाय व सुखसंपत्तीच्या बाबतीत जर हे नवीन वर्ष बघितले तर ते चांगले यश देणारे ठरणार आहे. येणाऱ्या नवीन वर्षामध्ये या व्यक्तींच्या बौद्धिक क्षमतेमध्ये चांगली वाढ होण्यास मदत होणार असून हे व्यक्ती पर्यटन,
लेखन तसेच अभिनय व नृत्य इत्यादी कलाक्षेत्राशी संबंधित असतील तर त्यांच्यासाठी येणारे वर्ष सुवर्ण काळ असणार आहे. तर या येणाऱ्या वर्षांमध्ये या लोकांवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असणार आहे व तरुणांना विदेशात जाण्याची संधी प्राप्त होणार आहे.
2- आर्थिक परिस्थितीच्या दृष्टिकोनातून- दोन मुलांक असलेल्या व्यक्तींच्या आर्थिक दृष्टिकोनातून जर आपण येणारे 2025 हे वर्ष पाहिले तर ते भरभराटीचे असणार आहे. तसेच या व्यक्तींकडे येणाऱ्या वर्षात पैशांची कमतरता भासणार नाही व आर्थिक उत्पन्न देखील वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे 2 मुलांक असलेल्या व्यक्तींच्या मनामध्ये जर मालमत्ता खरेदी करण्याचा विचार असेल किंवा तसा प्रयत्न करत असतील तर त्या प्रयत्नांना खूप चांगले यश या कालावधीत मिळणार आहे.
3- आरोग्याच्या दृष्टिकोनातून- आरोग्याच्या बाबतीत बघितले तर येणारे 2025 हे वर्ष दोन मुलांक असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत थोडेसे चढउताराचे असू शकते. कारण मंगळ ग्रहाचे प्रभुत्व असल्या कारणामुळे मानसिक तणाव जाणवू शकतो. दुसरे महत्त्वाचे म्हणजे चंद्राचा प्रभाव देखील असल्यामुळे स्वभावामध्ये शीतलता व शांतपणा जाणवेल.
तसेच या व्यक्तींनी येणाऱ्या वर्षांमध्ये वेळेचे नियोजन करणे खूप गरजेचे आहे.यामागील प्रमुख कारण म्हणजे आरोग्य तसेच तुमचे मन आणि आहार या तिन्ही गोष्टींचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. म्हणून या तिन्ही गोष्टीत नियोजन अत्यंत गरजेचे ठरणार आहे.
4- विवाहाच्या दृष्टिकोनातून- दोन मुलांक असणाऱ्या व्यक्तींसाठी येणारे नवीन वर्ष हे विवाहाच्या दृष्टिकोनातून उत्तम असे असणार आहे. या नवीन वर्षामध्ये ज्या व्यक्तींचे विवाहाचे मुहूर्त आहे त्यांच्यासाठी हा सर्वात्तम काळ असणार आहे.
तसेच 2 या मुलांकाचा स्वामी ग्रह चंद्र असल्यामुळे प्रेम संबंधांमध्ये किंवा नात्यांमध्ये जर काही वाद असतील तर ते दूर होण्यास मदत होणार आहे. परंतु लव लाईक मात्र सामान्य असणार आहे.
( टीप- वरील माहिती वाचकांसाठी माहितीस्तव सादर केलेली आहे. या माहितीचे अहमदनगर लाईव्ह 24 कुठल्याही प्रकारचे समर्थन करत नाही अथवा या माहितीविषयी कुठलाही दावा करत नाही.)