तुमच्याही तळहातावर ‘अशा पद्धती’ची खूण आहे का? जर असेल तर या वयापर्यंत व्हाल तुम्ही श्रीमंत, वाचा माहिती

Published on -

भारतीय समाजामध्ये ज्योतिषशास्त्राला खूप महत्त्व असून अजून देखील बऱ्याच लोकांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे. कुठल्याही गोष्टीची सुरुवात करायची असेल किंवा एखादे वाहन किंवा घर खरेदी करायचे असेल तरी आपण ज्योतिषशास्त्रानुसार मुहूर्त पाहूनच त्याची खरेदी करतो.

इतक्या मोठ्या प्रमाणावर ज्योतिषशास्त्र हे भारतीय लोकांच्या मनामध्ये रुजलेले आहे. ज्याप्रमाणे पंचांग पाहून ज्योतिषी भविष्य सांगतात अगदी त्याचप्रमाणे बरेच ज्योतिषी हातावरच्या रेषा पाहून देखील भविष्य सांगतात व यालाच हस्तरेषा शास्त्र देखील म्हटले जाते.

या प्रकारामध्ये तळहातावरील ज्या काही रेषा असतात त्यांचे आकलन करून भविष्य सांगतात. आपल्याला माहित आहे की प्रत्येक व्यक्तीच्या तळहातावर विशिष्ट प्रकारच्या रेषा असतात. ज्योतिष शास्त्रानुसार या रेषा व्यक्तीच्या यश अपयशाशी निगडित असतात. त्यामध्ये जर आपण हस्तरेषा शास्त्रानुसार बघितले तर  व्यक्तीच्या हातावर जर व्ही(V) आकाराचे चिन्ह असेल किंवा रेषा असतील तर आयुष्यामध्ये त्या व्यक्तीची खूप मोठी प्रगती होते.

 तळहातावर कोणत्या ठिकाणी असते हे व्ही आकाराचे चिन्ह

व्ही आकाराचे चिन्ह तळहाताच्या वरच्या बाजूला असते. ज्या व्यक्तीच्या तळ हातावर अशा प्रकारची खूण असते अशा व्यक्तीला एका विशिष्ट वयाच्या कालावधीत यश मिळण्याची शक्यता असते. जर तळहातावर V आकाराचे चिन्ह असेल तर हस्तरेषा शास्त्रानुसार तुमच्या आयुष्य उज्वल असणार हे पक्के. आज जरी बऱ्याच संकटांचा आणि आव्हानांचा तुम्ही सामना करत असाल परंतु येणारा भविष्यकाळ हा तुमच्यासाठी खूप फायद्याचा आणि सुंदर असणार हे यावरून ठरते.

 वयाच्या 35 नंतर आयुष्य घेते लाभदायक वळण

हस्तरेषा शास्त्रानुसार बघितले तर हाताची बोटाची तर्जनी आणि मधल्या बोटांमध्ये व्ही चिन्ह हे खूप शुभ मानले गेले असून त्यासोबतच तळहातावर हे चिन्ह असेल तर त्या लोकांचे नशीब वयाच्या 35 वर्षानंतर चमकते. अगोदर या लोकांना अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागतो.

परंतु आयुष्याच्या या टप्प्यानंतर मात्र त्यांनी घेतलेल्या कष्टाचे त्यांना फळ मिळायला सुरुवात होते. तसेच तळहातावर व्ही चिन्ह असलेले व्यक्ती भाग्यवान असतात. हे चिन्ह असलेले स्त्री पुरुष त्यांचे वैवाहिक जीवन देखील खूप प्रेमाने जगतात व  एकमेकांशी खूप चांगला समन्वय ठेवून आयुष्य व्यतित करतात.

तसेच हे लोक पैसे देखील खूप कमावतात. यापैकी काही व्यक्ती मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये नोकरी करतात. एवढेच नाही तर मोठ्या पदांवर देखील अशा लोकांना नियुक्ती मिळते व सरकारी नोकऱ्या देखील मिळतात.

हातावर हे चिन्ह असलेले लोक वयाच्या 30 ते 35 वर्षाचे होईपर्यंत खूप पैसे कमवतात व विलासी, आनंदी जीवन जगतात. तसेच ते कुठल्याही कठीण प्रसंगांना न घाबरता हिमतीने तोंड देतात. प्रामुख्याने अशा लोकांचे नसीब हे वयाच्या 35 व्या वर्षापासून उजळायला सुरुवात होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News