Astrology Tips:- जेव्हा रात्री झोपून आपण सकाळी उठतो तेव्हा आपण ताजेतवाने आणि फ्रेश मूडमध्ये उठणे तितकेच गरजेचे असते व या सकाळी उठण्याचा चांगला किंवा वाईट परिणाम हा संपूर्ण दिवसाच्या दिनचर्यावर होत असतो. तुम्ही जितके फ्रेश आणि पॉझिटिव्हली सकाळची सुरुवात कराल तितका सकारात्मक परिणाम तुम्हाला दिवसांच्या तुमच्या संपूर्ण कामावर दिसून येतो.
तसेच सकाळी उठून काही गोष्टी करणे देखील तितकेच गरजेचे असते. असे सांगितले जाते की रोज सकाळी आपण जेव्हा उठतो तेव्हा सगळ्यात अगोदर आपण आपल्या तळहातांचे दर्शन घ्यावे. कारण आपल्या तळहातामध्ये लक्ष्मी तसेच सरस्वती व गोविंद यांचा वास असतो.
दिवसभर सकारात्मक राहण्यासाठी सकाळची सुरुवात चांगली होणे खूप गरजेचे असते. तसेच सकाळी उठल्यावर जर आपल्याला काही गोष्टी दिसल्या किंवा दृष्टीस पडल्या तर त्या संपूर्ण दिवसासाठी काहीतरी फायदा देणाऱ्या ठरू शकतात.
सकाळी जर अशा गोष्टी तुम्हाला दिसल्या किंवा तुमच्याशी काही प्रसंग घडले तर नक्कीच ठरते फलदायी
1- समजा तुम्ही सकाळी अंथरुणावरून उठलात आणि तुम्हाला जर पक्षांचा किलबिलाट ऐकायला आला तर समजा की तुमच्या दिवसाची सुरुवात उत्तम होणार आहे. याकरिता तुम्हाला पहाटे उठणे खूप गरजेचे आहे. अर्थशास्त्रामध्ये देखील सांगितले आहे की जो व्यक्ती ब्रह्म मुर्तावर उठतो म्हणजेच ज्याचे दिवसाच्या सुरुवात या मुहूर्तावर होते त्याचा दिवस चांगला जातो.
2- तुम्ही सकाळी उठून तयार झाला व कामाकरिता बाहेर निघाला व त्यावेळेस तुम्हाला एखादी स्त्री किंवा पुरुष पूजेच्या वस्त्रामध्ये जाताना दिसला तर त्याच्या दर्शनाने तुमचा दिवस चांगला जाऊ शकतो. नाहीतर तुम्हाला एखादे मोठे काम देखील मिळू शकते.
3- समजा तुम्ही सकाळी उठले व तुम्हाला पांढरे फुले दिसले तरी तुमचा दिवस आनंददायी जातो.
4- तसेच ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर सकाळी जर तुम्हाला दुधाचे भरलेले पातेले दिसले तर हे एक संपन्नतेचे लक्षण समजले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार तुम्ही जर घरामध्ये दही आणि दुधाची साठवणूक केली तर तुमच्या घरात लक्ष्मीची कृपा कायम राहते.
5- सकाळी सकाळी घराबाहेर कामासाठी निघताना गोमातेचे म्हणजेच गाईचे दर्शन होणे देखील शुभ असते. गाईच्या दर्शनाने देखील नोकरी,व्यवसायामध्ये भरभराट संभवते.
6- सकाळी सकाळी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे दर्शन घडणे देखील शुभ समजले जाते. याचा अर्थ तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील त्याचे ते चिन्ह असते.
7- एखाद्या झाडाला जर फळे लागलेली पाहिली तरी तुमच्या प्रयत्नांना देखील लवकर चांगले फळ मिळेल असा त्याचा अर्थ होतो.
8- सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला जर एखाद्या घरातील देव्हाऱ्यातील किंवा मंदिरातील घंट्याचा नाद ऐकू आला तर एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता असते. एखादे रखडलेले काम पूर्ण होण्याची देखील शक्यता असते.