ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रह आणि तारे व त्यांचा राशींवर पडणारा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम याचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो व त्यानुसार संबंधित राशीनुसार त्या त्या व्यक्तीचे राशिभविष्य आपण जाणून घेऊ शकतो. ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांचे परिवर्तन किंवा गोचर इत्यादींचा शुभ आणि अशुभ प्रभाव देखील आपल्याला राशीवर पाहायला मिळतो
व ते आपल्याला ज्योतिष शास्त्रानुसार पाहता येत असते.अगदी याच पद्धतीने जर आपण गुरु या सुख सौभाग्याचा आणि समृद्धीचा प्रतीक असलेल्या ग्रहाचा विचार केला तर गुरु ग्रह 20 ऑगस्ट रोजी रोहिणी नक्षत्रातून मृग शिरा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे
व त्यामुळे 20 ऑगस्ट ते 28 नोव्हेंबर 2024 पर्यंत मृगशिरा नक्षत्रामध्येच राहणार असल्याने गुरुची ही स्थिती काही राशींच्या लोकांसाठी खूप पैसा देणारी आणि फायद्याची ठरणार आहे.
गुरुचे नक्षत्र परिवर्तन करणार या तीन राशींना मालामाल
1- वृषभ– गुरु ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाचा शुभ परिणाम आपल्याला वृषभ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळणार आहे. या कालावधीमध्ये या राशींच्या लोकांच्या कुटुंबामध्ये आनंदी आनंदाचे वातावरण राहिल व आर्थिक स्थिती चांगली राहील.
समाजामध्ये मानसन्मान मिळेल व आयुष्यामध्ये देखील अनेक मोठे बदल होऊ शकतात. या राशीच्या लोकांवर कर्ज असेल तर ते फेडण्यास देखील या कालावधीत मदत होईल.
या कालावधीत या लोकांना अनेक नवनवीन गोष्टी शिकण्याची चांगली संधी मिळणार आहे.तसेच विद्यार्थ्यांसाठी हा एक उत्तम कालावधी आहे. करिअरमध्ये देखील यश मिळेल व प्रमोशन देखील होऊ शकते.
2- सिंह राशी– गुरु ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाचा अनेक महत्त्वपूर्ण फायदा सिंह राशींच्या लोकांना होणार आहे. या राशींच्या लोकांच्या करिअरमध्ये जर काही समस्या असतील तर या कालावधीमध्ये दूर होणार असून आर्थिक स्थिती देखील चांगली राहणार आहे.
व्यावसायिक व खाजगी आयुष्यामध्ये चांगली प्रगती होणार असून प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना या कालावधीत उत्तम यश मिळू शकते. जे अविवाहित असतील त्यांचे लग्न ठरण्याचा योग आहे.
3- धनु– गुरु ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाचा फायदा धनु राशीच्या व्यक्तींवर मोठ्या प्रमाणावर होणार आहे. धनु राशींच्या व्यक्तींसाठी हा कालावधी खूप सकारात्मक असणार आहे.
या कालावधीमध्ये या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल व वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात देखील सुख शांती राहील व भाग्याचे साथ मिळण्यास हा कालावधी उत्तम आहे. तसेच या कालावधीत मानसन्मान वाढीस लागेल व वैवाहिक आयुष्यातील अनेक ताणतणाव दूर होण्यास मदत होईल.