तुमचा गण देव,राक्षस आहे की मनुष्य? कोणत्या गणाच्या व्यक्तीचा कसा असतो स्वभाव? जाणून घ्या काय म्हणते ज्योतिषशास्त्र?

ज्योतिषशास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल अनेक अर्थाने आपल्याला माहिती मिळत असते व ही माहिती व्यक्तीची जन्मतारीख व त्यानुसार त्याची कुंडली तसेच ग्रहताऱ्यांची स्थिती इत्यादी वरून ज्योतिष शास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली असते.

Ajay Patil
Published:
astrology

Astrology Science:- ज्योतिषशास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल अनेक अर्थाने आपल्याला माहिती मिळत असते व ही माहिती व्यक्तीची जन्मतारीख व त्यानुसार त्याची कुंडली तसेच ग्रहताऱ्यांची स्थिती इत्यादी वरून ज्योतिष शास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली असते.

ज्योतिष शास्त्रामध्ये बघितले तर मनुष्याचा जन्माच्या नक्षत्रांवर आधारित तीन श्रेणी करण्यात आलेले आहेत. यामध्ये देवगण तसेच मनुष्यगण व राक्षसगण अशा प्रकारच्या या श्रेणी असून या गणाच्या आधारे देखील एखाद्या व्यक्तीचा स्वभाव किंवा व्यक्तिमत्व कसे आहे हे ठरवले जाऊ शकतो. तसेच कोणता व्यक्तीचा गण कोणता असतो याची देखील माहिती आपल्याला ज्योतिष शास्त्रामध्ये आढळून येते.

कोणत्या गणाच्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो?

1- मनुष्य गण- ज्या व्यक्तींचा जन्म रोहिणी, अद्रा तसेच भरणी, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, पूर्वाभाद्रपद किंवा उत्तराभाद्रपद, उत्तराषाढ इत्यादी नक्षत्रात झालेला असतो असे व्यक्ती मनुष्यगण या श्रेणीमध्ये येतात. ज्या व्यक्तींचा मनुष्यगण असतो असे व्यक्ती सन्माननीय असतात व श्रीमंत देखील असतात.

विचारांच्या बाबतीत देखील ते स्थिर असल्याचे आपल्याला दिसून येते व त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये एकंदरीत आपल्याला स्थिरता दिसते. तसेच हे व्यक्ती भविष्याविषयी जास्त चिंता करत नाही आणि आपल्या कामावर विश्वास ठेवतात.

मनुष्य गण असलेल्या व्यक्तींवर जर कुठलीही जबाबदारी दिली तरी ते प्रामाणिकपणे पार पडतात. आयुष्यामध्ये ते संयमीपणाने वागतात व संतुलित जीवन जगतात.

2- देवगण- ज्या व्यक्तींचा जन्म अश्विनी, मृगाशिरा, स्वाती, पुनर्वसू, हस्त, अनुराधा तसेच श्रवण किंवा रेवती या नक्षत्रामध्ये झालेला असतो असे व्यक्ती देवगण या श्रेणी अंतर्गत येतात. ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर या गणचे लोक खूपच बुद्धिमान असतात व हृदयाने देखील ते अतिशय कोमल व भावनिक असतात.

त्यांची विचारसरणी अतिशय उच्च असते व ते इतरांच्या कल्याणाचा कायम विचार करतात. तसेच हे लोक परोकारावर व दानधर्मावर खूप विश्वास ठेवतात व धार्मिक कार्यामध्ये कायम पुढे असतात.

हे लोक देवावर खूप विश्वास ठेवतात व त्यांची अपार श्रद्धा असते. इतरांवर त्यांची माया खूप मोठ्या प्रमाणावर असते व ते दयाळु असतात. देवगन असलेल्या व्यक्तींचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते कायम स्वतःपेक्षा इतरांचे भले कसे होईल यावर जास्त लक्ष देतात.

3- राक्षस गण- ज्या व्यक्तींचा जन्म धनिष्ठा, मघा, चित्रा तसेच शतभिषा किंवा ज्येष्ठ नक्षत्रात झालेला असतो त्या व्यक्तींचा गण राक्षस गण असतो. या व्यक्तींमध्ये निगेटिव्हिटी एनर्जी म्हणजेच नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणावर असते. या व्यक्तीची इच्छाशक्ती खूपच प्रबळ असते व ते धैर्यवान असतात.

तसेच स्वभावाने देखील ते स्वतंत्र असतात व विशेष म्हणजे त्यांच्या कामांमध्ये कोणी हस्तक्षेप केलेले त्यांना अजिबात आवडत नाही. काही बाबतीत त्यांची विचारसरणी ही कट्टर स्वरूपाची असते व पटकन राग येण्याची त्यांना सवय असते. स्वभावाने हे व्यक्ती खूप कणखर असतात व कुठलेही ध्येय साध्य करण्याचा त्यांचा एक निर्धार असतो.

(टीप- वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती वाचकांसाठी माहितीस्तव सादर केली आहे. या माहितीचे कुठल्याही प्रकारचे समर्थन अथवा दावा अहमदनगर लाईव्ह 24 करत नाही.)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe