Numerology:- कोणतेही येणारे नवीन वर्ष हे अनेक अर्थांनी खूप महत्त्वपूर्ण असते. ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर येणाऱ्या नवीन वर्षामध्ये अनेक ग्रह त्यांची राशी बदलणार आहेत व त्यामुळे अनेक राजयोग तयार होणार आहेत व निश्चितच याचाच परिणाम हा 12 राशींवर चांगल्या किंवा वाईट स्वरूपात दिसून येणार आहे.
काही राशीच्या व्यक्तींवर या ग्रह परिवर्तनाचा किंवा ग्रहांच्या गोचराचा सकारात्मक परिणाम दिसतो किंवा काही राशींवर हा नकारात्मक परिणाम देखील पाहायला मिळतो. अगदी याचप्रमाणे आपण अंकशास्त्रानुसार बघितले तर येणाऱ्या नवीन वर्षांमध्ये काही जन्मतारखांसाठी येणारे वर्ष खूप फायद्याचे ठरणार आहे तर काहींसाठी थोडेफार प्रमाणात चढउतार देखील असणार आहे.
आपल्याला माहित आहे की, अंकशास्त्रामध्ये व्यक्तीची जन्मतारीख आणि त्यानुसार त्याचा मूलांक यानुसार एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल माहिती दिली जाते. जन्मतारीख ही अंकशास्त्रामध्ये खूप महत्त्वाची समजली जाते. या अंकशास्त्राच्या मदतीने जन्मतारीख तसेच जन्म महिना आणि वर्ष या तीन गोष्टींच्या आधारे एखाद्या व्यक्तीच्या भविष्यबाबत जाणून घेता येते.
अंकशास्त्रानुसार बघितले तर एक ते नऊ असे मूलांक असतात व त्या जन्म तारखेच्या अंकांची बेरीज करून मुलांक काढला जातो. या अनुषंगाने आपण या लेखात बघणार आहोत की ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या नऊ, 18 आणि 27 तारखेला झालेला आहे म्हणजेच ज्या लोकांचा मुलांक हा 9 आहे अशा व्यक्तींसाठी येणारे 2025 हे नवीन वर्ष कसे जाईल? याबाबत माहिती बघणार आहोत.
कोणत्याही महिन्याच्या 9,18 व 27 या तारखांना जन्म झालेल्या लोकांसाठी येणारे नवीन वर्ष कसे असेल?
येणारे नवीन वर्ष 2025 हे नऊ मुलांक असणाऱ्या व्यक्तींसाठी अतिशय खास असणार आहे. 9 मुलांकाच्या दृष्टिकोनातून बघितले तर याचा स्वामीग्रह हा मंगळ आहे. यामुळे हे व्यक्ती अत्यंत हुशार असतात तसेच ते खूप एनर्जी म्हणजेच ऊर्जावान आणि धाडसी देखील असतात.
कुठल्याही बाबतीत ते अत्यंत आत्मविश्वासू असतात व कोणतेही काम करताना ते अगदी मनापासून करतात व व मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतात. येणारे हे वर्ष या लोकांसाठी आर्थिक प्रगती होण्यासाठी खूप सकारात्मक असे वर्ष आहे.महत्वाचे म्हणजे पैसे कमावण्यासाठी आवश्यक असलेले नवीन आर्थिक स्त्रोत मिळतील.
तसेच करिअरमध्ये देखील या नवीन वर्षामध्ये या लोकांचे मोठ्या प्रमाणावर प्रगती होणार आहे. तसेच हे व्यक्ती शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत असतील तर त्यांना दुप्पट फायदा होण्याची शक्यता आहे.प्रॉपर्टीच्या संदर्भात देखील येणारे नवीन वर्ष नऊ मुलांक असलेल्या व्यक्तींसाठी खूप फायद्याचे आहे.
या येणाऱ्या वर्षांमध्ये हे व्यक्ती फ्लॅट किंवा जमीन तसेच वाहनाची खरेदी करू शकतात.तसेच जे काम हाती घेतील ते काम पूर्ण करतील. तसेच जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत असतील त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर यश या येणाऱ्या वर्षात मिळणार आहे व या सगळ्या दृष्टिकोनातून बघितले तर येणारे नवीन वर्ष 2025 हे नऊ मुलांक असलेल्या व्यक्तींसाठी अतिशय फायद्याचे ठरणार आहे.