अंकशास्त्रामध्ये व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचा मुलांक काढला जातो व त्या मुलांकावरून संबंधित व्यक्तीचा स्वभाव आणि त्याचे व्यक्तिमत्व कशी आहे याबाबतची माहिती आपल्याला मिळत असते. याप्रमाणे ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रह किंवा ताऱ्यांच्या स्थितीनुसार व्यक्तीच्या आयुष्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला जातो.
अगदी त्याचप्रमाणे अंकशास्त्रामध्ये व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा स्वभाव किंवा त्याचे व्यक्तिमत्व कसे आहे याबाबतची माहिती आपल्याला मिळत असते. यानुसार आपण अंकशास्त्रानुसार बघितले तर कोणत्याही महिन्याच्या आठ, 17 आणि 26 तारखेला ज्या लोकांचा जन्म झालेला आहे त्यांचा मुलांक आठ असतो व अशा व्यक्तींचे व्यक्तिमत्व कसे असते याविषयीची देखील आपल्याला उत्तम माहिती या माध्यमातून मिळते.
कोणत्याही महिन्याच्या 8,17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्त्व कसे असते?
1- एकटे राहायला आवडते– वरील तारखांना जन्मलेले लोकांचा मुलांक आठ असतो व हे लोक खूप अंतर्मुख असतात. त्यांना स्वतःचेच निरीक्षण करायला खूप आवडते व त्यांचा स्वभाव एकलकोंडा असतो. म्हणजे त्यांना लोकांमध्ये मिसळायला आवडत नाही व एकटे राहायला आवडते व ते लाजाळू देखील असतात.
2- सहजासहजी यश मिळत नाही– या तारखांना जन्मलेले व्यक्ती यशस्वी होण्यासाठी खूप धडपडतात. परंतु सहजासहजी त्यांना कोणत्याही प्रकारचे यश लवकर मिळत नाहीत. यश मिळवण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागते व तेव्हा कुठे त्यांना यशाची चव चाखायला मिळते. परंतु कितीही अडचणी आल्या तरी निराश न होता संयमाने प्रत्येक गोष्ट हाताळत राहतात.
3- वेळेनुसार श्रीमंत होतात– आठ मुलांक असलेल्या लोकांचा स्वामीग्रह शनी असल्यामुळे त्यांना कठीण मेहनत घेतल्यानंतरच यश मिळत असते. त्यांना ज्या क्षेत्रामध्ये करिअर करायचे असते त्या क्षेत्रामध्ये ते प्रगती करतात व मेहनतीने श्रीमंत देखील होतात. हे व्यक्ती कुठलाही खर्च खूप विचार करूनच करतात व त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर पैसा असतो त्यांचे आर्थिक गणित देखील उत्तम असते.
4- कुटुंबासोबत पटत नाही– आठ मुलांक असलेल्या लोकांचा एक महत्त्वाचा कमजोर मुद्दा म्हणजे त्यांचे कुटुंबासोबत फारसे पटत नाही. एका कामापर्यंत ते मर्यादित प्रमाणामध्ये नातेसंबंध टिकवतात व कोणासोबत मैत्री सुद्धा लवकर करत नाही. या लोकांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये प्रेमाची कमतरता दिसून येते.
5- राजकारणात प्रगती करतात– आठ मुलांक असलेले व्यक्ती राजकारण इत्यादी क्षेत्रांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती करतात. हे व्यक्ती मेहनत घेऊन त्यांच्या आयुष्य व्यवस्थित जगत असतात.
6- कोणावरही अन्याय करत नाही– या लोकांचे सगळ्यात महत्त्वाचे गुणवैशिष्ट्ये म्हणजे हे लोक कोणासोबत अन्याय करत नाहीत आणि त्यांच्यावर झालेला अन्याय देखील सहन करत नाही. जर अन्याय झाला तर ते अन्यायाच्या विरोधात आवाज उठवतात.
(टीप– ही माहिती ही अंकशास्त्रावर आधारित असून ती वाचकांसाठी माहितीस्तव सादर केलेली आहे. या विषयावर आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा किंवा या माहितीचे समर्थन करत नाहीत.)