Numerology:- ज्योतिष शास्त्रामध्ये ज्याप्रमाणे व्यक्तीचा जन्म कोणत्या तारखेला झालेला आहे ती तारीख तसेच जन्माची वेळ व वार इत्यादी वरून त्याची कुंडली काढली जाते व यावरून संबंधित व्यक्तीचे आयुष्य कसे असेल किंवा त्याच्या आयुष्याबद्दलचे भाकिते वर्तवले जातात. अगदी त्याचप्रमाणे अंकशास्त्र देखील एक महत्त्वाचे शास्त्र असून तसे पाहायला गेले तर व्यक्तीच्या जीवनामध्ये अंकशास्त्राचे खूप असे महत्त्व आहे.
अंकशास्त्रामध्ये व्यक्तीचा जन्म ज्या तारखेला झालेला असतो ती तारीख आणि त्या तारखेवरून निघणाऱ्या त्याचा मुलांक यावरून संबंधित व्यक्तीच्या आयुष्याबद्दल बरीच माहिती आपल्याला मिळते किंवा त्याचे भविष्य आपल्याला कळत असते. मुलांक जर बघितले तर अंकशास्त्र मध्ये एक ते नऊ असे मुलांक असून वेगवेगळ्या तारखांना जन्म झालेल्या व्यक्तींचा मुलांक हा वेगवेगळा असतो.

अगदी त्याचप्रमाणे दहा तारखेला जन्मलेले लोक हे आयुष्यामध्ये कसे असतात किंवा करिअरच्या दृष्टिकोनातून त्यांच्या आयुष्यामध्ये कसे बदल घडतात किंवा ते किती यशस्वी होतात? ही व इतर अनेक महत्त्वाची माहिती अंकशास्त्रामध्ये मिळते.
अगदी त्याच पद्धतीने आपण कोणत्याही महिन्याच्या दहा तारखेला जन्मलेले लोक आयुष्यामध्ये कसे असतात किंवा त्यांची जीवनशैली किंवा जीवनामध्ये यशस्वी होतात का? इत्यादी बद्दलची महत्वाची माहिती या लेखात घेऊ.
दहा तारखेला जन्म झालेले व्यक्ती आयुष्यात कमवतात भरपूर पैसा
अंकशास्त्रानुसार जर बघितले तर दहा तारखेला ज्या लोकांचा जन्म झालेला असतो ते उत्साही आणि भरपूर ऊर्जावान असे असतात व खूप मेहनती देखील असतात.
यांच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणा मोठ्या प्रमाणावर असतो व त्यामुळे ते मोठे यश प्राप्त करतात. तसेच व्यक्ती स्वच्छता प्रिय असतात व आरामदायी जीवनशैली जगायला त्यांना आवडते. संगीत तसेच कला व साहित्य इत्यादी गोष्टींमध्ये त्यांना विशेष आवड असते.
अंकशास्त्रानुसार बघितले तर दहा तारखेला ज्या लोकांचा जन्म झालेला असतो त्यांचा मूलांक एक असतो व स्वामीग्रह सूर्य असतो. त्यामुळे ते प्रचंड आत्मविश्वासाने भरलेले असतात व त्यांच्या मध्ये नेतृत्वगुण देखील मोठ्या प्रमाणावर असतो.
महत्त्वकांक्षी आणि दृढनिश्चयी असतात
कोणत्याही महिन्याच्या दहा तारखेला जन्म झालेले लोक हे जीवनामध्ये अत्यंत जिद्दी स्वभावाचे असतात व स्वाभिमानी देखील असतात. दुसऱ्याच्या अधिपत्याखाली काम करायला त्यांना अजिबात आवडत नाही
व त्यामुळे ते स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याला प्राधान्य देतात. कितीही कठीण परिस्थिती उद्भवली तरी त्या परिस्थितीला न घाबरतात ते धीराने तोंड देतात.
आयुष्यात खूप धनसंपत्ती मिळवतात
तसेच दहा तारखेला जन्मलेले लोक हे खूप कष्टाळू असतात आणि बुद्धिमान असल्याने त्या जीवावर खूप धन कमवतात आणि स्वतःवर आणि इतरांना देखील खूप मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करतात. या व्यक्तीचे एक वैशिष्ट्य असे असते की ते दिखाव्यामध्ये खूप विश्वास ठेवतात आणि अतिशय शानदार पद्धतीने जीवन जगण्यावर विश्वास ठेवतात.
प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनामध्ये देखील ते खूप सुखमय असतात. तसेच दहा तारखेला जन्मलेल्या लोकांमध्ये नेतृत्व गुण उत्तम असतो व त्यामुळे ते चांगले प्रशासक आणि चांगला नेता देखील बनतात. ते मुळात घाबरत नाही आणि कुठलीही चुकीची परिस्थिती आली तरी त्यामध्ये लोकांना स्वीकारू शकत नाहीत.
विचार असतात उच्च
तसेच या लोकांची विचारसरणी देखील उच्च दर्जाची असते. आयुष्यामध्ये ते मोठे स्वप्न पाहतात व ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अफाट कष्ट घेतात. रविवार हा दहा तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी शुभ मानला जातो
व रविवारी त्यांनी कुठलेही काम केले तरी त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त असते. कोणत्याही प्रकारचे आव्हान आले तरी त्याचे संधीमध्ये रूपांतर करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते व आयुष्यामध्ये ते चांगल्या प्रकारे जगतात.