Numerology:- व्यक्तीच्या आयुष्यावर अनेक ग्रह तारे, ग्रहताऱ्यांची स्थिती इत्यादी गोष्टींचा खूप खोलवर परिणाम होत असतो व याचा सगळा अभ्यास ज्योतिष शास्त्रात केला जातो. ज्योतिष शास्त्रामध्ये आपल्याला व्यक्तीच्या ग्रह दशा वरून त्याचे आयुष्य कसे असेल? याबाबत आडाखे बांधता येतात.
तसेच त्या व्यक्तीचा स्वभाव, तसेच त्यामध्ये असलेले गुण इत्यादी गोष्टी देखील सांगता येतात. परंतु या ज्योतिष शास्त्रात अंकशास्त्राला देखील खूप महत्त्व असून एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून तो व्यक्ती आयुष्यात कसा जगतो किंवा कसा वागतो? त्याचे स्वभाव गुण कसे आहेत?
इत्यादीबद्दल माहिती आपल्याला मिळते. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा मुलांक जाणून घेता येतो व या मुलांकावरून त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे? हे आपल्याला कळते. त्यामुळे आपण या लेखात आठ मुलांक असलेली व्यक्ती किंवा लोक कसे असतात? समाजामध्ये वागताना त्यांची रीत कशी असते? त्याबद्दल माहिती घेऊ.
8 मुलांक असलेली व्यक्ती कसे असतात?
कुठल्याही महिन्याच्या आठ, 17 आणि 26 तारखेला ज्या व्यक्तींचा जन्म झालेला असतो त्या व्यक्तींचा मूल्यांक हा आठ असतो. अंकशास्त्रानुसार बघितले तर आठ मुलांक असलेले लोक खूप कष्टाळू आणि महत्त्वाकांक्षी असतात व त्यामुळे ते आयुष्यामध्ये देखील खूप प्रगती करतात. हे व्यक्ती खूप शांत व गंभीर असे मानले जातात.
विशेष म्हणजे हे व्यक्ती कुठल्याही गर्दी किंवा गोंगाटामध्ये मिसळत नाहीत व त्याऐवजी त्यांना एकटे राहिला आवडते. सामाजिक कार्यक्रम किंवा पक्ष संघटनांच्या कामांमध्ये हे लोक कधीही सहभागी होत नाहीत.
आठ मुलांक असलेली व्यक्ती असतात कंजूष
ज्या व्यक्तींचा मुलांक 8 असतो असे लोक खूप कंजूष मानले जातात व ते नेहमी पैसे वाचवण्याचा विचार व प्रयत्न करत असतात. त्यांना कुणालाही पैसे देणे किंवा कुणाकडून पैसे घेणे आवडत नाही. म्हणजे पैशांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा धोका ते पत्करत नाहीत. तसेच कुठल्याही प्रकारचा फालतू खर्च देखील ते टाळतात व त्यामुळे त्यांच्याकडे खूप पैसा शिल्लक राहतो.
तसेच हे लोक जीवनामध्ये खूप महत्त्वाकांक्षी असतात व त्यासाठी खूप मेहनत घेऊन अनेक उच्च पदांना गवसणी घालतात. जीवन जगत असताना जीवनाच्या वाटेत कितीही अडचणी आल्या तरी ते मोठ्या धैर्याने त्याला तोंड देतात.
आठ मुलांक असलेल्या व्यक्तींमध्ये नेतृत्व गुण देखील चांगला असतो व ते त्यामुळे कोणत्याही संस्थेमध्ये उच्च पदावर आपल्याला आढळून येतात. तसेच एखाद्या व्यवसायामध्ये देखील ते खूप नशीबवान असतात व त्यांना व्यवसायामध्ये देखील भरपूर नफा मिळतो.
कौटुंबिक नात्यात मात्र होतात वाद
ज्या व्यक्तींचा मुलांक आठ आहे असे लोक सामाजिक किंवा समाजामध्ये फारसे मिसळत नाहीत. त्यांना एकटं राहायला आवडते व यामुळेच अनेकदा त्यांच्या कौटुंबिक नात्यात वाद निर्माण होतात व अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागू शकते. अशा व्यक्तींच्या पती-पत्नीच्या नात्यांमध्ये देखील गोडवा राहत नाही व अनेक वेळा त्यांना एकटे जीवन व्यतीत करावे लागते.