Shadashtak Rajyog:- ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर ग्रहांचे जे काही राशी परिवर्तन होत असते त्यामुळे अनेकदा अनेक शुभ राजयोग तयार होत असतात. या राजयोगाचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम हा प्रत्येक राशीवर होत असतो. तसेच ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांच्या राशी परिवर्तनाला म्हणजेच गोचराला खूप असे महत्त्व असून त्या दृष्टिकोनातून तयार होणारे राजयोग किंवा राशी परिवर्तनामुळे राशींवर पडणारा चांगला किंवा वाईट परिणाम या दृष्टिकोनातून ज्योतिष शास्त्रामध्ये अनेक महत्त्वाची माहिती आपल्याला मिळत असते.
याच अनुषंगाने जर आपण बघितले तर सध्या ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचा सेनापती म्हणून मंगळ ग्रह ओळखला जातो व हा ग्रह देखील काही कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करत असतो. अगदी याच पद्धतीने आता मंगळाचे राशी परिवर्तन होणार असल्यामुळे त्याचा चांगला प्रभाव हा बारा राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळणार आहे.
तसेच महत्त्वाचे म्हणजे कर्माची देवता म्हणून ओळखले जाणारे शनिदेखील साधारणपणे अडीच वर्षात एकदा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात व सध्या जर आपण कर्माची देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शनीची स्थिती पाहिली तर सध्या शनी त्याच्या मूळ त्रिकोण राशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंभ राशीत विराजमान आहे.
म्हणजेच शनि आणि मंगळ एकमेकांपासून सहाव्या आणि आठव्या घरात उपस्थित असल्यामुळे षडाष्टक राजयोग निर्माण होणार आहे. यामुळे काही राशींच्या व्यक्तींना खूप फायदा होणार असून अशा राशी प्रचंड प्रमाणात पैशांच्या दृष्टिकोनातून मालामाल होऊ शकणार आहेत.
षडाष्टक राजयोगामुळे या तीन राशी होतील मालामाल
1- मेष राशी- मेष राशीच्या व्यक्तींकरिता षडाष्टक राजयोग खूप फायद्याचा ठरणार आहे. या काळामध्ये या व्यक्तींच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यास मदत होईल व आर्थिक स्थिती देखील उत्तम राहणार आहे.
तसेच कौटुंबिक वातावरण देखील आनंदाचे राहील व वैवाहिक जीवन देखील सुख-समृद्धीने भरलेले असणार आहे. मेष राशीचे जे व्यक्ती नोकरी करतात त्या व्यक्तीच्या कष्टाचे कौतुक होईल व या काळात वरिष्ठ खुश असतील. तसेच जे नवीन नोकरी शोधत आहेत त्यांना देखील मनासारखी नोकरी मिळेल.
2- तुळ राशी- षडाष्टक राजयोग हा तूळ राशीच्या व्यक्तींकरिता खूप फायद्याचा ठरणार आहे. या काळात तुम्हाला विशेष लाभ मिळेल तसेच अनेक पद्धतीने अचानक धनलाभ देखील होण्याची शक्यता आहे. इतकेच नाहीतर कुठल्याही कामांमध्ये कुटुंबाची साथ मिळेल. घरामध्ये सुख तसेच शांती लाभेल व भाग्याची पुरेपूर साथ मिळण्यास मदत होईल.
या कालावधीत दूरचा प्रवास घडू शकतो.तसेच कुठे पैसे अडकलेले असतील तर ते देखील मिळतील. प्रेमात असाल तर प्रेमाचे संबंध अत्यंत सुखदायी असे होतील. महत्वाचे म्हणजे आरोग्य देखील चांगले राहील.
4- कुंभ राशी- षडाष्टक राज योगामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल पाहायला मिळेल. या कालावधीमध्ये कुंभ राशींच्या व्यक्तींच्या सुख सुविधांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वाढ होईल तसेच नव्या वस्तू खरेदी कराल. तसेच कुंभ राशीचे जे व्यक्ती नोकरी करत असतील त्यांना प्रमोशन मिळेल.
कौटुंबिक वातावरण आनंदी आनंदाचे राहिल व स्पर्धा परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. इतकेच नाहीतर शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम असेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील व करिअरमध्ये देखील चांगली प्रगती होईल.
( टीप- वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती वाचकांसाठी माहितीकरिता सादर करण्यात आलेली आहे. या माहितीविषयी अहमदनगर लाईव्ह 24 कुठल्याही प्रकारचा दावा अथवा समर्थन करत नाही.)