ज्योतिष शास्त्रानुसार पाहिले तर प्रत्येक ग्रह काही ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करत असतात.या ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा चांगला किंवा वाईट परिणाम हा संपूर्ण बारा राशींवर होताना आपल्याला दिसून येत असतो.
एवढेच नाही तर या राशी परिवर्तनामुळे अनेक राजयोग देखील तयार होता व याचा देखील चांगला किंवा वाईट परिणाम हा राशींवर होतो. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण कर्माची देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शनि देवाचा विचार केला तर सध्या शनिदेव हे कुंभ राशीमध्ये विराजमान असून याच राशीत अस्त स्थितीत आहेत
व शनि देवाची ही स्थिती जवळपास 17 मार्चपर्यंत राहणार आहे. त्यामुळे काही राशींना खूप काळजी घेण्याची आवश्यकता भासणार आहे.
या राशींच्या व्यक्तींच्या कामादरम्यान अनेक अडथळे देखील येऊ शकणार आहेत. त्यामुळे या लेखात आपण शनीदेवाच्या या अस्त स्थितीचा कोणत्या राशींवर वाईट व अशुभ परिणाम होणार आहे? त्याबद्दलची माहिती घेऊ.
शनि देवाच्या अस्त स्थितीचा या राशींवर होईल अशुभ परिणाम
1- कुंभ- कुंभ राशींच्या व्यक्तींवर सध्या शनिची साडेसाती सुरू असून शनिदेवाच्या अस्त स्थितीच्या दरम्यान कुंभ राशींच्या व्यक्तींच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
कुंभ राशींच्या व्यक्तींनी या कालावधीमध्ये कुठलाही निर्णय घाई गडबडीत देऊ नये. एवढेच नाही तर काही वाईट संगतीत देखील तुम्ही येऊ शकतात. या कालावधीत काही मोठे नुकसान होण्याची शक्यता असून आयुष्यात अनेक चढ-उतार देखील येण्याची शक्यता आहे.
तुमचे तुमच्या जोडीदाराशी वाद विकोपाला जाऊ शकतात व त्यामुळे तुम्ही वेगळे होण्याची देखील शक्यता उद्भवू शकते. काही मोठ्या आजाराला देखील बळी पडू शकतात. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
2- मीन- शनिच्या अस्त अवस्थेमुळे मीन राशींच्या लोकांवर सर्वात जास्त नकारात्मक परिणाम किंवा प्रभाव पडण्याची शक्यता असून या राशींच्या व्यक्तींची प्रलंबित कामे या काळात अजून रखडले जातील. मीन राशींच्या व्यक्तींनी या कालावधीत कोणतीही मोठ्या प्रमाणातली गुंतवणूक करू नये.
रागावर नियंत्रण ठेवावे व एखादी मोठी समस्या निर्माण होईल असे काम करू नये. नोकरी आणि व्यवसायामध्ये देखील नशीब तुम्हाला साथ देणार नाही.
3- मकर- शनिदेवाच्या अस्त स्थितीमुळे मकर राशींच्या व्यक्तींच्या अडचणीत वाढ होणार असून या काळात दुष्ट आणि कपटी लोकांपासून सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
सध्या मकर राशींच्या व्यक्तींवर शनीची साडेसाती चालू आहे त्यातच शनिदेवाच्या अस्त स्थितीमुळे खूप त्रास सहन करावा लागू शकतो. कायदेशीर कारवाई होऊ शकते.तसेच मकर राशीच्या लोकांना करिअर क्षेत्रात खूप त्रास होईल.
ऑफिसमध्ये एखादे काम बिघडण्याची शक्यता असून त्यामुळे नोकरी देखील जाण्याची शक्यता उद्भवू शकतो. तसेच मकर राशींच्या व्यक्तींचे आरोग्य देखील बिघडू शकते व कुटुंबात वादाची स्थिती निर्माण होऊ शकते.
( टीप– वरील माहिती ही ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यम म्हणून आम्ही काम करत आहोत. याविषयी आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा करत नाहीत.)