नवीन वर्षाची सुरुवात ‘या’ राशींसाठी ठरेल नुकसानदायक? पैसे तसेच वाहन चालवणे इत्यादी बाबतीत येऊ शकतात अडचणी?

नवीन वर्षाच्या स्वागताची उत्सुकता आपल्याला प्रत्येकाला आता लागून राहिली असून येणाऱ्या काही दिवसात 2024 वर्ष संपणार आणि 2025 या नवीन वर्षाचे आगमन होणार आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत एक नावीन्यपणा आणि नवीन गोष्टींची सुरुवात त्यासाठी येणारे नवीन वर्ष हे महत्वाचे ठरणार आहे.

Horoscope 2025:- नवीन वर्षाच्या स्वागताची उत्सुकता आपल्याला प्रत्येकाला आता लागून राहिली असून येणाऱ्या काही दिवसात 2024 वर्ष संपणार आणि 2025 या नवीन वर्षाचे आगमन होणार आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत एक नावीन्यपणा आणि नवीन गोष्टींची सुरुवात त्यासाठी येणारे नवीन वर्ष हे महत्वाचे ठरणार आहे.

तसेच नवीन वर्षामध्ये जर आपण ग्रहताऱ्यांची स्थिती बघितली तर ज्योतिष शास्त्रानुसार या वर्षाच्या सुरुवातीला आणि काही ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत व त्याचा प्रभाव बारा राशींवर कशा पद्धतीने पडेल हे देखील पाहणे तितकेच गरजेचे आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार बघितले तर येणारे हे नवीन वर्ष काही राशींसाठी खूप फलदायी आहे तर काही राशीसाठी मात्र काही प्रमाणात नुकसान देणारे ठरू शकते. या नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर तर बघितले तर शनी साधारणपणे 2025 पर्यंत त्याच्या मूळ त्रिकोण कुंभ राशीमध्ये विराजमान असणार आहे.

मात्र सूर्य हा 12 फेब्रुवारी 2025 रोजी कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे व 14 मार्चपर्यंत याच राशीमध्ये सूर्य विराजमान राहील. त्यामुळे साहजिकच अगोदर या राशीत शनी असल्यामुळे व नंतर सूर्याचे आगमन कुंभ राशीत होणार असल्याने दोन्ही ग्रहांची युती निर्माण होणार आहे. परंतु ही दोन्ही ग्रहांची युती मात्र काही राशींसाठी फलदायी नाहीतर नुकसानदायक ठरणारी आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला या राशींना होऊ शकतो काही बाबतीत त्रास

1- तूळ राशी- कुंभ राशीमध्ये शनी आणि सूर्याची जी काही युती या नवीन वर्षामध्ये होणार आहे. त्यामुळे तूळ राशींच्या व्यक्तींना ती तितकीशी फायद्याची नाही. या कालावधीमध्ये कुटुंबातील वरिष्ठांच्या आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते.त्यामुळे वरिष्ठांची काळजी घेणे गरजेचे आहे.

आयुष्यामध्ये काही अडचणी निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी मन लागणार नाही व त्यामुळे साहजिकच तुमचे वरिष्ठ नाराज होण्याची शक्यता राहील.

यामुळे ताणतणावाची स्थिती देखील राहू शकते व व्यर्थ पैसा खर्च होईल.त्यामुळे या कालावधीत तूळ राशींच्या व्यक्तींनी शांतपणे प्रत्येक निर्णय घेणे गरजेचे आहे व कुठल्याही कामांमध्ये घाई करू नये. तसेच काही स्वार्थी लोक तुमच्या संपर्कात असतील तर त्यांच्यापासून दूर राहणे तुमच्या फायद्याचे ठरेल.

2- मिथुन राशी- कुंभ राशीमध्ये होणारी सूर्य आणि शनीची युती मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी देखील नुकसानदायक ठरणारी आहे. मिथुन राशींच्या व्यक्तींनी या कालावधीत शत्रूंपासून सावध राहणे गरजेचे आहे. तुमचा काही प्लॅनिंग असेल तर अशा काही गोष्टी किंवा मनातील गोष्टी इतर लोकांना सांगू नयेत व सांगण्याआधी थोडा विचार करावा.

विपरीत आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे या व्यक्तींनी या कालावधीत वायफळ खर्च होणार नाही याकडे लक्ष द्यावे. तसेच गुंतवणुकीचा प्लानिंग असेल तर गुंतवणूक करू नये. तुम्ही ज्या ठिकाणी काम करत असाल त्या ठिकाणी विनाकारण वाद घालू नये व रागावर नियंत्रण ठेवावे.

3- कन्या राशी- शनि व सूर्याची युती ही कन्या राशीच्या व्यक्तींसाठी देखील अडचणीची ठरणारी आहे. या कालावधीमध्ये कन्या राशीच्या व्यक्तींनी स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे व बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. तसेच या कालावधीमध्ये कुठल्याही कामाकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला फायद्याचे ठरणार नाही व त्यामुळे कामावर व्यवस्थित लक्ष ठेवावे.

तसेच वाहन चालवताना काळजी घ्यावी व सांभाळून वाहन चालवावे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुठल्याही गोष्टीवर कुटुंबात वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी व वाद टाळण्याचा प्रयत्न करावा.

( टीप- वरील माहिती वाचकांसाठी माहितीस्तव सादर करण्यात आलेली आहे व या माहितीविषयी अहमदनगर लाईव्ह 24 कुठल्याही प्रकारचा दावा किंवा या माहितीचे समर्थन करत नाही.)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe