30 कोटी नागरिकांना मिळणार कोरोनाची लस; पहा काय म्हणाले आरोग्यमंत्री

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- देशातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज दिल्लीतही महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर pयांनी एक महत्वाची माहिती दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं की, लोकांना घाबरुन जाण्याची गरज नाही.

स्वदेशी लस तयार करण्यात आली आहे आणि आमच्याकडे 30 कोटी लशीकरणाची क्षमता असेल. जीनोम सिक्वेंस आणि कोरोना विषाणू यांना वेगवेगळे करुन मिळालेल्या माहितीआधारे प्रभावी लस विकसित करण्यात भारताचे शास्त्रज्ञ यशस्वी झाले आहेत.

हे आत्मनिर्भर भारत मोहिम यशस्वी करण्यासाठी टाकलेले आणखी एक दमदार पाऊल आहे, असेही केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले.

6 ते 7 महिन्यांत भारतात 300 दशलक्ष लोकांना लस देण्यास सक्षम असतील.राज्याबद्दल सांगावयाचे झाल्यास येथे कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट कायम आहे. नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने दिलासा मिळाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment