7th Pay Commission Update : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! आता इतका वाढणार पगार, जाणून घ्या सविस्तर

Ahmednagarlive24 office
Published:

7th Pay Commission Update : गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये केंद्र सरकारकडून वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा सरकारकडून आनंदाची बातमी मिळू शकते.

आता लवकरच सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या वर्षातील दुसऱ्या वेळेसच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वर्षातून दोन वेळा वाढ करण्यात येते. त्यातील पहिली DA वाढ नुकतीच करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांची मागील DA वाढ केंद्र सरकारकडून ४ टक्के करण्यात आली आहे. ही DA वाढ कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२३ पासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून DA वाढ मिळणार आहे.

पुढील DA वाढ जुलै महिन्यात होण्याची शक्यता

सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये दोन वेळा वाढ केली जाते. तसेच आता दुसरी DA वाढ जुलै महिन्यात केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या कर्मचाऱ्यांचा DA ४ टक्क्यांनी वाढून ४६ टक्के झाला आहे.

सरकार 4 टक्के वाढीचा कल कायम ठेवू शकते

२०२४ मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून पुढील निवडणुका लक्षात घेता कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये आणखी ४ टक्के वाढ केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा DA ५० टक्के होऊ शकतो.

जुलै 2023 मध्ये DA आणि DR वाढेल

केंद्र सरकारकडून या वर्षातील २०२३ मधील कर्मचाऱ्यांची DA वाढ 24 मार्च 2023 रोजी ४ टक्के करण्यात आली आहे. तसेच आता जुलै महिन्यात देखील कर्मचाऱ्यांच्या DA आणि DR मध्ये वाढ केली जाण्याची शक्यता आहे.

जानेवारी आणि जुलै महिन्यात DA मध्ये वाढ होते

केंद्र सरकारकडून वर्षातून २ वेळा कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ केली वाजते. यामधील पहिली DA वाढ करण्यात आली आहे. दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यात कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ केली जाते.

एक कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा

DA वाढ आणि DA वाढीनंतर पुन्हा एकदा सुमारे 47.58 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69.76 लाख पेन्शनधारकांच्या पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ नोंदवली जाऊ शकते. विशेष म्हणजे, डीए कर्मचार्‍यांच्या मूळ वेतनावर आधारित आहे. DA मध्ये वाढ केल्याने कर्मचाऱ्यांचा मूळ पगार वाढतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe