7th Pay Commission Update : कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जुलै महिन्यात मिळणार दोन भेटवस्तू, जाणून घ्या सविस्तर

7th Pay Commission Update : केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अनेक निर्णय घेतले जात आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ करण्यात आली आहे. आता सरकारकडून कर्मचाऱ्यांना लवकरच आणखी एक गोड बातमी मिळू शकते.

जुलै महिन्यामध्ये कर्मचाऱ्यांना दोन नवीन भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांचा वर्षातील दुसरी DA वाढ आणि फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कर्मचाऱ्यांना मागील वेळी सरकारकडून ४ टक्के DA वाढ करण्यात आली आहे. तसेच आता देखील कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये आणखी ४ टक्के DA वाढ केली जाण्याची शक्यता आहे. आता सध्या कर्मचाऱ्यांचा DA ४२ टक्के आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांची मागणी पाहता केंद्र सरकार जुलैमध्ये फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची घोषणा करू शकते. विशेष म्हणजे, केंद्रीय कर्मचारी अनेक दिवसांपासून फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी करत आहेत. वास्तविक, फिटमेंट फॅक्टर अंतर्गत मूळ वेतनात वाढ होते.

फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (7वा वेतन आयोग) 2.57 टक्के दराने फिटमेंट फॅक्टर दिला जात आहे. तसेच आता कर्मचाऱ्यांकडून फिटमेंट फॅक्टरमध्ये 3.68 पट वाढ करण्याची मागणी केली जात आहे.

जर कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर 2.57 वरून 3.68 पर्यंत वाढल्याने, किमान मूळ वेतन 18,000 वरून 26,000 रुपये होईल. जर फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये बंपर वाढ होईल.

किमान मूळ वेतन 2.57 वरून 3.68 पर्यंत वाढवण्याची मागणी

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर 2016 मध्ये वाढवण्यात आला आहे. २०१६ मध्येच कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्यावेळी कर्मचाऱ्यांचे किमान पगार थेट ६००० रुपयांवरून १८,००० रुपयांपर्यंत वाढला होता.

किमान मूळ वेतन 18000 वरून 26000 रुपये करण्याची मागणी

फिटमेंट फॅक्टर सर्व केंद्रीय सरकारी कर्मचार्‍यांचे मूळ वेतन निर्धारित करते. यावेळी, फिटमेंट फॅक्टरमध्ये संभाव्य वाढ झाल्यास, किमान मूळ वेतन 18000 रुपयांवरून 26000 रुपये होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यामध्ये दोन मोठ्या भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe