Electric Scooter : भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात आता अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध होत आहेत. तसेच इंधनाच्या किमती अधिक वाढल्याने अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडत आहेत. आता आणखी एक इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत दाखल झाली आहे.
इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती अधिक असल्याने ते अनेकांना खरेदी करणे परवडत नाही. मात्र तुमचे कमी बजेट असले तरीही तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता. Ather कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही फक्त 2975 मध्ये खरेदी करू शकता.
फायनान्स ऑफरबद्दल जाणून घ्या
जर तुमचे इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचे स्वप्न असेल आणि बजेट कमी असेल तर काळजी करू नका. कारण तुम्ही फायनान्स करून देखील इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता. Ather कंपनी त्यांच्या 450X इलेक्ट्रिक स्कूटरवर ऑफर देत आहे. 2975 डाउनपेमेंट करून तुम्ही स्कूटर खरेदी करू शकता.
Ather कंपनीचे सध्या अनेक कंपन्यांशी टायअप आहेत. यामध्ये चोला फायनान्स, एचडीएफसी, हीरो मोटर कॉर्प आणि आयडीएफसी वन या बँकांचा समावेश आहे. या सर्व बँका या इलेक्ट्रिक स्कूटरच्या खरेदीवर 100% वित्तपुरवठा करत आहेत.
उत्तम फीचर्स
Ather कंपनीकडून 450X इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. स्कूटरमध्ये 3.7 Kwh क्षमतेची लिथियम आयन बॅटरी वापरण्यात आली आहे. तसेच 6.2kw मोटर बसवण्यात आली आहे.
ही इलेक्ट्रिक स्कूटर 26 एनएमचा टॉर्क जनरेट करू शकते. तसेच सिंगल चार्जवर १४६ किलोमीटरपर्यंत या इलेक्ट्रिक स्कूटरवर प्रवास करता येऊ शकतो असा कंपनीकडून दावा करण्यात येत आहे. टॉप स्पीड ताशी 90 किलोमीटर आहे.
किंमत
बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त 2 तास लागतात. इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, ती 1.17 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे. तुम्ही फायनान्स करून कमी बजेटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता.