Aadhaar-Ration card linking : देशातील नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून आधार कार्ड अनिवार्य केले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्वांकडे आधार कार्ड आहे. आता कागदपत्रांमध्ये मुख्यतः आधारकार्ड मागितले जाते.
पण सरकारकडून देशात आधार कार्ड हे सर्वात महत्वाचे बनवले गेले आहे. तसेच आता पॅनकार्ड देखील आधार कार्डशी लिंक करणे सरकारकडून बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी सरकारकडून ३१ मार्च २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

तसेच आता सरकारकडून रेशन कार्डशी आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. रेशन कार्ड द्वारे सरकारकडून देशातील गरीब नागरिकांना कमी दरात धान्य दिले जाते. तसेच सध्या नागरिकांना २०२४ पर्यंत मोफत धान्य दिले जाणार आहे.
सरकारकडून रेशनकार्डशी आधारकार्ड लिंक करण्याची शेवटची मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत देण्यात आली आहे. सरकारचा यामागचा उद्देश आसा आहे की डुप्लिकेट आणि बनावट रेशनकार्ड निष्क्रिय करण्यात येतील.
तुम्ही रेशनकार्डशी आधारकार्ड ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने देखील करू शकता. जर तुमचेही आधार कार्ड रेशनकार्डशी लिंक करणे राहिले असेल तर खालील पद्धतीने तुम्ही करू शकता.
ऑनलाइन लिंक करण्यासाठी काय करावे?
तुमच्या राज्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) वेबसाइट उघडा (प्रत्येक राज्याचे स्वतःचे PDS पोर्टल आहे).
तुमचा आधार तुमच्या विद्यमान कार्डाशी लिंक करण्याचा पर्याय निवडा.
त्या क्रमाने तुमचे रेशन कार्ड, आधार कार्ड आणि नोंदणीकृत मोबाईल फोन नंबर टाका.
‘कंटिन्यू/सबमिट’ हा पर्याय निवडा.
तुमच्या सेल फोनवर मिळालेला OTP एंटर करा.
प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला एसएमएस पाठवला जाईल.
ऑफलाइन लिंक कशी करावी?
तुम्हाला तुमच्या दस्तऐवजांची मूळ आणि प्रत दोन्ही तुमच्या जवळच्या सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) केंद्रावर आणणे आवश्यक आहे.
ही महत्त्वाची कागदपत्रे PDS किंवा रेशन दुकानात उपलब्ध करून द्या.
PDS किंवा रेशन दुकानाचे कर्मचारी तुमच्या आधार कार्डची वैधता पडताळण्यासाठी फिंगरप्रिंट प्रमाणीकरण वापरतील.
प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला एसएमएस अलर्ट प्राप्त होईल.
तुमचे आधार आणि रेशन कार्ड योग्यरित्या लिंक झाल्यावर तुम्हाला आणखी एक एसएमएस मिळेल.