Aadhar Card News:- आधार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र असून कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आता अनिवार्य करण्यात आलेले आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला बँकेत खाते उघडायचे असेल तरीदेखील तुम्हाला आधार कार्ड लागते.
एकंदरीत पाहता सर्वच शासकीय व इतर अशासकीय कामांना देखील आता आधार कार्ड आवश्यक करण्यात आलेले आहे. त्यामुळे हे महत्त्वाचे असलेले कागदपत्र अपडेट ठेवणे देखील तितकेच गरजेचे आहे. कारण आधार कार्डवर जर नावात, जन्मतारखेत किंवा लिंग इत्यादी मध्ये काही चुका झालेल्या असतील तर तुम्हाला अनेक त्रासाला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे तुमच्या आधार कार्ड अपडेट करून घेणे हे खूप गरजेचे आहे. आधार कार्ड जर अपडेट करायचे असेल तर युआयडीएआयच्या माध्यमातून माय आधार या पोर्टलवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असून यासंबंधीचाच एक महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे.
14 मार्चपर्यंत करू शकतात मोफत आधार अपडेट
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ज्या व्यक्तींना आधार कार्ड मध्ये मोफत बदल करायचे आहेत ते आता 14 मार्च पर्यंत करू शकणार असून युआयडीएआयच्या माध्यमातून माय आधार पोर्टलच्या माध्यमातून आधार तपशील मोफत अपडेट करण्यासाठीची मुदत वाढ करण्यात आलेली आहे.
ही मोफत अपडेट सुविधा आता तीन महिन्यांसाठी म्हणजेच 15 डिसेंबर पासून ते 14 मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात आलेले असून त्यासंबंधीचे निवेदन देखील युआयडीएआयच्या माध्यमातून 11 डिसेंबर 2023 ला जारी करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे 14 मार्चपर्यंत आधार अपडेट करणे याची प्रक्रिया ही विनामूल्य असणार आहे.
फक्त यामध्ये लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे जेव्हा तुम्ही ऑनलाईन अपडेट कराल त्याकरिता ही सुविधा मोफत असणार आहे. परंतु कागदपत्र अपडेट करण्याकरिता तुम्हाला आधार सेंटरवर जाणे गरजेचे आहे व आधार सेंटरवर तुम्हाला 25 रुपये इतकी फी भरणे गरजेचे आहे.
आधार कार्ड अपडेट का करून घ्यावे?
युआयडीएआयच्या माध्यमातून ज्या लोकांनी दहा वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर देखील आधार अपडेट केलेले नाही त्यांच्याकरिता आधार अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. आपल्याला माहित आहेस की आधार कार्ड च्या माध्यमातून अनेक फसवणुकीच्या घटना समोर आलेल्या आहेत व आधारशी संबंधित फसवणुकीला आळा बसावा याकरिता आधार अपडेटचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
याबाबत यूआयडीएआयने संकेतस्थळावर म्हटले आहे की, लोकसंख्या शास्त्रीय माहितीच्या सतत अचूकतेकरिता तुमचे आधार कार्ड अपडेट करून घेणे गरजेचे आहे. ऑनलाइन पद्धतीने तुम्ही नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, ईमेल आयडी आणि फोन नंबर इत्यादी अपडेट करू शकतात.परंतु फोटो, डोळे किंवा इतर बायोमेट्रिक माहिती अपडेट करायचे असेल तर तुम्हाला आधार सेंटरवर प्रत्यक्षपणे जाणे गरजेचे आहे.