अबब! BSNL च्या अपडेट झालेल्या ‘हा’ प्लॅनमध्ये मिळतोय 1095 GB डेटा तसेच फ्रीमध्ये मिळणार ‘ह्या’ साऱ्या सुविधा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या नवनवीन प्लॅन बाजारात आणत आहेत. लॉकडाउनच्या काळात इंटरनेटचा वाढता वापर पाहता अनेक नवनवीन स्कीम अनेक कंपन्यांनी बाजारात आणल्या आहेत.

नवीन ग्राहकांना आकर्षित करणे आणि त्यांना तसा बेनिफिट देणे हे लक्ष्य आणि उद्दीष्ट ठेऊन अनेक कंपन्या आपले प्लॅन्स आणत आहेत. आता बीएसएनएलने जिओ,

एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या आघाडीच्या खासगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी अनेक बदल स्वतःमध्ये केले आहेत. बीएसएनएलने आता 1,999 रुपयांचा वार्षिक प्लॅन अपडेट केला आहे.

ह्या’ प्लॅनमधील नवीन फायदे :- BSNL ने नवीन अपडेटमध्ये कॉलिंग आणि डेटाच्या बाबतीत कोणताही बदल केलेला नाही. पण, आता Lokdhun आणि Eros Now यांचं युजर्सना फ्री सबस्क्रिप्शन दिलं जात आहे.

यापूर्वी या प्लॅनमध्ये Lokdhun चं एका वर्षासाठी आणि Eros Now चं 60 दिवांसाठी सबस्क्रिप्शन मिळायचं. पण आता नव्या अपडेटनंतर Lokdhun चं 60 दिवसांसाठी आणि Eros Now चं सबस्किप्शन 365 दिवसांसाठी भेटेल.

एक जानेवारी 2021 पासून नवीन अपडेट लागू होईल. तसेच या प्लॅनमध्ये दररोज 3 जीबी म्हणजे एकूण 1095 जीबी डेटा वापरण्यास मिळतो. याशिवाय सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, 365 दिवसांपर्यंत दररोज 100 SMS पाठवण्याची सुविधा मिळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment