अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :-विप्रो या आयटी कंपनीच्या अझीम प्रेमजी यांनी परोपकारी लोकांच्या लिस्टमध्ये सर्वोच्च स्थान निर्माण केले आहे. पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात देणगी देऊन ते देशातील सर्वात मोठे देणगीदार झाले आहेत. हारून इंडियाने जाहीर केलेल्या परोपकारांच्या यादीतून ही माहिती समोर आली आहे.
अजीम प्रीमजी सर्वाधिक दानवीर भारतीय :- आयटी क्षेत्रातील विप्रोचे मालक अझीम प्रेमजी यांनी आर्थिक वर्ष 2020 मध्ये दररोज 22 कोटी रुपये दान केले आहेत. त्यांनी संपूर्ण वर्षात 7,904 कोटी रुपये दान केले आहेत. आर्थिक वर्ष 2020 मध्ये ते सर्वात उल्लेखनीय दानवीर भारतीय म्हणून उदयास आले आहे.
दुसर्या क्रमांकावर एचसीएलचे शिव नाडर:- दान देण्याच्या बाबतीत, अझीम प्रेमजी पाठोपाठ एचसीएल टेक्नॉलॉजीजचे मालक शिव नाडर यांचा नम्बर आहे. शिव नाडर यांनी आर्थिक वर्ष 2020 मध्ये 795 कोटींची देणगी दिली. गेल्या वर्षी त्यांनी सामाजिक कामांसाठी 826 कोटी दान केले. शिव नाडर आर्थिक वर्ष 2019 मध्ये देशातील सर्वात मोठे देणगीदार होते. त्याच वेळी, अझीम प्रेमजी यांनी 2019 मध्ये 426 कोटींची देणगी दिली होती.
मुकेश अंबानी तिसर्या क्रमांकावर :- देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी हेदेखील देणगीच्या बाबतीत देशातील अग्रणी आहेत. देणगीदारांच्या यादीत ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. आर्थिक वर्ष 2020 मध्ये त्यांनी 458 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्याच वेळी, मागील वर्षी त्यांनी 402 कोटींची देणगी दिली. या यादीत चौथ्या क्रमांकावर आदित्य बिर्ला समूहाचे कुमार मंगलम बिर्ला तर पाचव्या क्रमांकावर वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल आहेत.
टॉप 10 मधील दानवीर
- 1 अजीम प्रेमजी 7,904 कोटी रुपये विप्रो
- 2 शिव नाडर 795 कोटी रुपये एचसीएल टैक्नोलॉजीज
- 3 मुकेश अंबानी 458 कोटी रुपये रिलायंस इंडस्ट्रीज लि.
- 4 कुमार मंगलम बिर्ला अँड फॅमिली 276 कोटी रुपये आदित्य बिर्ला ग्रुप
- 5 अनिल अग्रवाल अँड फॅमिली 215 कोटी रुपये वेदांता ग्रुप
- 6 अजय पीरामल अँड फॅमिली 198 कोटी रुपये पीरामल
- 7 नंदन नीलकेणी 159 कोटी रुपये इंफोसिस 8 हिंदुजा ब्रदर्स 133 कोटी रुपये हिंदुजा ग्रुप
- 9 गौतम अदानी 88 कोटी रुपये अदानी
- 10 राहुल बजाज अँड फॅमिली 71 कोटी रुपये बजाज
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved