अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कार दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांना जाहीर झाला आहे.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. अभिनेता रजनीकांत यांचे अभिनेता, निर्माता आणि पटकथा लेखक म्हणून असलेलं योगदान महत्वाचं आहे.
‘ या आशयाचे ट्वीट करत प्रकाश जावडेकर यांनी ज्यूरी सदस्यांचे आभार मानले आहेत. सिनेसृष्टीतल महत्वाची कामगिरी करणाऱ्या अभिनेत्याला दरवर्षी दादा साहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलं जात.
यंदाचा हा पुरस्कार सुपरस्टार रजनीकांत यांना जाहीर करण्यात आला आहे. रजनीकांत हे तुमच्या आमच्यासारखा हाडामासाचा माणूस आहेत.
पण तमिळनाडूमध्ये त्यांना देवाचा दर्जा मिळाला आहे. आपल्या जादुई अभिनयातून जेवढं त्यांनी नाव कमवलं त्याहून कित्येक पटीने त्यांनी लोकांची मदत करून नाव कमावलं आहे. सुपरस्टार रजनीकांतचे भारतातच नव्हे तर जगभरात लाखोंच्या संख्येने चाहते आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|